
मनमाड । प्रतिनिधी Manmad
प्रवाशांना सर्व सुविधा मिळाव्या यासाठी रेल्वे स्थानकाचे कायापालट करण्याकरिता केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या 'अमृत भारत स्टेशन योजने'च्या पहिल्या टप्प्यात माझ्या नाशिक जिल्ह्यातील मनमाडसह इतर तीन रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आल्या बद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मना पासून आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद देते असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी केले.
आज(रविवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमृत भारत योजने अंतर्गत कायापालट केल्या जाणार्या देशभरातील 508 रेल्वे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले मनमाडचा देखील त्यात समावेश असल्यामुळे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मंत्री भारती पवार बोलत होत्या.
यावेळी मंचावर डीआर एम इति पांडे,एडीआरएम कौशेल्न्द्र कुमार,भाजपचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ,माजी अध्यक्ष दादासाहेब जाधव,जिल्हाउपजिल्हा नितीन पांडे पंकज खताळ, शहराध्यक्ष जयकुमार फुलवानी, सुवर्णा जगताप,सचिन दराडे,गणेश शिंदे, दीपक देसले, सचिन लुणावत, संदीप नरवडे, एकनाथ बोडखे आदी उपस्थित होते.
मंत्री डॉ. भारती पवार पुढे म्हणाल्या कि मोदी सरकार सत्तेवर आल्या पासून देशातील सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहे एका प्रकारे देशात विकासाची घोडदौड सुरु असून याचाच एक भाग म्हणून देशातील रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अमृत भारत स्टेशन योजना सुरु करण्यात आली आहे या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानक घेण्यात आले त्यात नासिक जिल्ह्यातील मनमाड,नांदगाव.लासलगाव यासह इतर रेल्वे स्थानकाचा समावेश आहे मनमाडसाठी 44.80 कोटी, नांदगावसाठी 10.14 कोटी. लासलगावसाठी 10.10 कोटी आणि नगरसूलसाठी 20.03 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
या निधीतून रेल्वे स्थानकावर दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज,अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज,दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था,नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदीं कामे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तर आदिवासी बांधवानी आदिवासी नृत्य सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. मंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते विद्यार्थी आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते संयोजन भुसावळ डिव्हिजन च्या प्रबन्धक इति पांडे.कौशेल्न्द्र कुमार. राहुल अग्रवाल, आर.पी. मीणा, धीरेन्द्र कुमार सिंग,युधिष्ठिर पाला, श्रीनिवास राव,विशाल भाकुने, मनीष क्षत्रिय एन,एस, काजी यांनी केले. रेल्वे सुरक्षा बळ, रेल्वे पोलीस आणि शहर पोलीस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.