Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याराजकीय ग्रुपसंदर्भात फेसबुकचा मोठा निर्णय

राजकीय ग्रुपसंदर्भात फेसबुकचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :

फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एक मोठी घोषणा केली आहे. यापुढे फेसबुकवर राजकीय ग्रुप्सची (civic and political groups) शिफारस केली जाणार नाही. तसेच फेसबुकने २०२० च्या शेवटच्या तिमाहीत चांगला नफा कमावला. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीला ११.२२ अब्ज डॉलर्स म्हणजेच प्रति शेअर ३.८८ डॉलर्सची कमाई केली.

- Advertisement -

अमेरिकेत ऑक्टोबरमध्ये, नोव्हेंबरमध्ये २०२० मध्ये झालेल्या निवडणुकी दरम्यान राजकीय ग्रुपसंदर्भात फेसबुकने निर्णय घेतला होता. कंपनी आपल्या न्यूज फीडमध्ये वापरकर्त्यांद्वारे पाहिलेली राजकीय माहिती कमी करण्याचा विचार करत आहे. झुकरबर्ग म्हणाले की, “आम्ही आमच्या कम्युनिटीकडून फीडबॅक घेतला आहे. तो पाहिल्यावर असे दिसून आले की, लोक आता राजकीय बातम्या पाहणे पसंत करत नाहीत. त्यामुळे त्यांनी सेवा बदलण्याचा विचार केला आहे.”

२०२० मध्ये वाढली फेसबुकची कमाई

कोरोना काळ असताना २०२० च्या शेवटच्या तिमाहीत फेसबुकचा धमाकेदार नफा झाला. डिजिटल जाहिरातींमधून मिळणारा महसूलही वाढला आहे. फॅक्टसॅटने केलेल्या सर्वेक्षणात विश्लेषकांनी फेसबुकने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत ११.२२ अब्ज डॉलर किंवा ३.८८ डॉलर्सचा नफा कमावला असल्याची माहिती देण्यात आली आहे. जी मागच्या वर्षाच्या कालावधीपेक्षा ५३ टक्के जास्त होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या