फेसबुक आपले नाव बदलणार

फेसबुक आपले नाव बदलणार

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) आपले नाव बदलणार आहे. कंपनी एका नावासोबत रिब्रँड करण्याची शक्यता आहे. द वर्जने यासंदर्भात माहिती दिली आहे. नाव बदलण्याबाबत सीईओ मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg)28 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या वार्षिक सभेत माहिती देण्याची शक्यता आहे.

फेसबुक आपले नाव बदलणार
शाहरुखने म्हटले होते, मुलाने ड्रग्स घ्यावे, डेटींग करावी अन...

कंपनीला सोशल मीडिया (Social media)प्लॅटफॉर्महून अधिकची ओळख मिळावी, यासाठी हा निर्णय घ्यायचा आहे. रिब्रँडिंगच्या उद्देशाने नावात बदल करण्याचा विचार होत आहे. रीब्रँडिंगमुळे फेसबुकच्या अॅपला मूळ कंपनीच्या अंतर्गत येणाऱ्या इतर उत्पादनांपैकी एक म्हणून स्थान देईल. मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादनं तयार करुन युजर्सला आकर्षित करण्याच्या उद्देशाने हा बदल होण्याची शक्यता आहे. कंपनीला त्याच्या व्यवसायाच्या पद्धतींवर अमेरिकन सरकारच्या वाढत्या तपासणीचा सामना करावा लागत आहे. गुगलनेही २०१५ मध्ये या पद्धतीने अल्फाबेट या कंपनीची स्थापना केली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com