फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन; कंपनीकडून माफीनामा

फेसबुक, इन्स्टाग्राम पुन्हा डाऊन; कंपनीकडून माफीनामा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आठवड्याभरात फेसबुक (Facebook) आणि इन्स्टाग्रामची (Instagram) दुसऱ्यांदा डाऊन झाली. या अ‍ॅप्सची सेवा डाऊन झाल्यामुळे अनेक युजर्सना समस्यांचा सामना करावा लागला...

रात्री १२ वाजेपासून एका तासासाठी दोन्ही ॲप्सची सेवा डाऊन झाली होती. आता ही सेवा पूर्ववत झाली आहे. याआधी सोमवारी सहा तासांहून अधिक वेळ फेसबुक, व्हॉट्सअॅप (Whatsapp) आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले होते.

दरम्यान, फेसबुक व इन्स्टाग्रामकडून याबाबत माफी मागण्यात आली आहे. तुम्हाला इन्स्टाग्रामचा वापर करण्यास काही समस्या निर्माण होत असतील. तर त्याबद्दल आम्हाला खेद आहे. आता समस्यांचे निराकरण करण्यात आले आहे. आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद, असे इन्स्टाग्रामने ट्विटरवरून म्हटले आहे.

काही युजर्सना ॲपचा वापर करण्यास समस्या निर्माण होत आहेत. जर तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेऊ शकत नसाल तर आम्हाला खेद आहे. एकमेकांसह संवाद साधण्यासाठी आमच्यावर तुम्ही किती अवलंबून आहात हे आम्ही जाणतो. आम्ही आता समस्येचे निराकरण केले आहे. संयम बाळगल्याबद्दल धन्यवाद, असे फेसबुकने म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com