Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशशेअर घसरले : फेसबुकला विकावेे लागणार WhatsApp ?

शेअर घसरले : फेसबुकला विकावेे लागणार WhatsApp ?

नवी दिल्ली

अमेरिकेतील ४८ राज्य फेसबुकविरोधात एकटवले आहे. यामुळे या दिग्गज सोशल मीडिया कंपनीच्या अडचणीत वाढ झाली आहे. अमेरिकेतील जवळपास सर्व राज्ये फेसबुकविरोधात एकवटल्याचं चित्र आहे.

- Advertisement -

अमेरिकेतील ४८ राज्यांनी आणि ‘युएस फेडरल ट्रेड कमिशन’ने फेसबुकविरोधात खटला दाखल केला आहे. फेसबुकवर एकाधिकार स्थापित करण्याचा आणि छोट्या प्रतिस्पर्ध्यांना ‘चिरडण्यासाठी’ बाजारातील ताकदीचा गैरवापर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. फेसबुकची मालकी असलेल्या इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचा बिजनेस पॅरेंट कंपनीपासून वेगळा ठेवण्याची मागणी याद्वारे करण्यात आली आहे. फेसबुकविरोधात हा खटला दाखल झाल्याचं वृत्त समोर येताच फेसबुकचे शेअर्सही गडगडले.

यापूर्वी अमेरिकेच्या निवडणुकांआधी गुगलविरोधातही खटला दाखल करण्यात आला होता. ऑनलाइन सर्च आणि जाहिरातींच्या मार्केटवर ताबा मिळवण्याचा आरोप गुगलवर करण्यात आला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या