फेसबुक डाटाची चोरी : सीबीआयने दाखल केला या कंपनीवर गुन्हा

फेसबुक डाटाची चोरी : सीबीआयने दाखल केला या कंपनीवर गुन्हा

नवी दिल्ली

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) फेसबुका डाटा चोरी प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. ५.६२ लाख भारतीय वापरकर्त्यांचा डाटा चोरल्याचा आरोप या कंपनीवर आहे.

इंग्लंडमधील कँब्रिज एनालिटिका या कंपनीवर भारतींचा फेसबुक डाटा चोरल्याचा आरोप आहे. या कंपनीने ५.६२ लाख भारतीय युजर्सचा डाटा चोरी केला. होता. त्यानंतर केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी कँब्रिज एनालिटिका प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश सीबीआयला दिले. ग्लोबल सायन्स रिसर्चने अवैधरित्या ५.६२ लाख युजर्सचा डाटा कँब्रिज एनालिटिकाला दिल्याचे सीबीआयच्या तपासातून स्पष्ट झाले. कँब्रिज एनालिटिककडून हा डाटा भारतातील निवडणुकींवर प्रभाव पाडण्यासाठी वापरला गेला. आता भारतात या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे कँब्रिज एनालिटिका

कँब्रिज एनालिटिका ही राजकीय सल्ला देणारी ब्रिटनमधील कंपनी आहे. या कंपनीवर २०१६ मध्ये ५ कोटी युजर्सचा डाटा चोरी केल्याचा आरोप झाला होता. या डाटाचा वापर अमेरिकेतील २०१६ मधील निवडणुकीत करण्यात आला होता. ट्रम्प यांची बाजू प्रभावीपणे मांडण्यासाठी डाटाचा वापर केल्या गेल्यामुळे अमेरिकेतही या कंपनीवर कायदेशीर कारवाई सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com