दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा

आमदार एकनाथराव खडसे यांचा गंभीर आरोप
दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा दूध संघात (District Milk Union) गेल्या सात वर्षात शेतकर्‍यांचे हित (Interest of farmers)जोपासण्याच्या दृष्टीने काम झाले आहे. तसेच दूध संघाचा विकास (Development of milk union) करण्यावरच संचालक मंडळाचा (Board of Directors) भर राहिला. मात्र, शासनाचा दबाव (Government pressure) आणून झुंडशाही सुरु आहे. ही झुंडशाही मोडीत काढण्यासाठी जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत (district milk union election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) संपूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे (NCP leader MLA Eknathrao Khadse) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान जिल्हा दूध संघाच्या 70 एकर (70 acres of land)जमिनीवर भाजपा नेत्यांचा (Eye of BJP leaders) डोळा असल्याचा गंभीर आरोपही आ. खडसे यांनी केला.

दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा
Accident# भरधाव डंपरने विद्यार्थिनीला चिरडले

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीबाबतचे नियोजन करण्यासाठी मंगळवारी अ‍ॅड. रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार एकनाथ खडसे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, आमदार अनिल पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ.सतीश पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रविंद्र पाटील, शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सुर्यवंशी माजी आमदार राजीव देशमुख, इंदिराताई पाटील, वाल्मिक पाटील, अमर जैन, नाना महाजन यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेस व शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.

दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा
धुळ्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

सोमवारी दूध संघाचे एमडी मनोज लिमये यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आल्याने आ. एकनाथराव खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपा नेत्यांवर टीकास्त्र सोडले. आमदार खडसे म्हणाल की, जिल्हा दूध संघातील 7 वर्षांच्या कार्यकाळात त्यांना एकही गैरव्यवहार दिसला नाही.

मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावरच चुकीचे व खोटे आरोप केले जात असल्याचा आरोप खडसेंनी केला. तसेच पोलीस प्रशासन देखील राज्य शासनाच्या दबावात काम करत असून, अशा कोणत्याही दबावाला आम्ही भीक घालत नसल्याचे खडसेंनी सांगितले.

दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा
विद्यापीठाच्या अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी तात्पुरती मतदार यादी प्रसिध्द

खडसेंना सोडून सर्वपक्षीय पॅनल शक्यच नाही

डॉ.सतीश पाटील यांना भाजपकडून सर्वपक्षीय पॅनलमध्ये येण्याचा आग्रह करण्यात आला होता. त्यासाठी अनेकांनी संपर्क देखील साधला. मात्र, आमचा आग्रह एकच होता. सर्वपक्षीय पॅनल तयार करताना एकही अटी-शर्थी लादता कामा नये.

एकनाथराव खडसे यांना या पॅनलमध्ये घेण्यास त्यांच्याकडून नकार दिला जात होता. त्यामुळेच आम्ही पक्षासोबतच कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे. खडसेंना सोडून कोणतीही सर्वपक्षीयची चर्चा होवू शकत नसल्याचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले.

दूध संघाच्या 70 एकर जमिनीवर भाजपा नेत्यांचा डोळा
Good news : जगाची लोकसंख्या 800 कोटींवर!

हिंम्मत असेल तर समोर येऊन लढा

निवडणुकीच्या तोंडावर घाणेरडे राजकारण केले जात असून, जर निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर पुर्ण ताकदीनिशी लढा असे आव्हान खडसेंनी दिले आहे. मविआचे सर्व उमेदवार तयार असून, भाजपच्या झुंडशाहीला आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत. मतदार आमच्या बाजूने असून, आमचाच विजय होईल असाही विश्वास खडसेंनी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com