नाशिकच्या मनसेनेत कमालीची 'शांतता'

नाशिकच्या मनसेनेत कमालीची 'शांतता'

नाशिक | फारुक पठाण | Nashik

नाशिक महापालिका (Nashik Municipality) निवडणूक कधी होणार हे अद्याप निश्चित नसले तरी विविध राजकीय पक्षांची तयारी काही ना काही पद्धतीने सुरू आहे, मात्र मागील अनेक दिवसांपासून 2012 ते 2017 या पाच वर्षाच्या काळात नाशिक महापालिकेत सत्ता असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (Maharashtra Navnirman Sena) मात्र शांत दिसत आहे.

मागच्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटी युवा नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) नाशिकला दौऱ्यावर आले होते. त्यानंतर मुंबईहून कोणीही मोठा नेता नाशिकला आला नाही तर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नजरेत भरेल असे काही काम केल्याचे दिसत नाही. त्यामुळे आगामी काळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का, अशी देखील चर्चा सुरू झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

नाशिकच्या मनसेनेत कमालीची 'शांतता'
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाला आधीच नारायण राणेंचे मोठे विधान; म्हणाले...

नाशिक शहर हा तसा ठाकरे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना मानणारा मोठा वर्ग नाशिक मध्ये आहे. त्यामुळे शिवसेनेकडून दूर झाल्यावर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची घोषणा देखील नाशिकमध्येच केली होती तर नाशिकमध्येच पक्षाचा पहिला महापौर बसला होता.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर नाशिककरांनी विश्वास टाकत 2012 च्या निवडणुकीत तब्बल 40 नगरसेवक निवडून दिले होते. त्या जोरावर सलग पाच वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता महापालिकेत होती. या काळात नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्या वेळेला शासनाने अनेक महिने पूर्णवेळ आयुक्त दिले नव्हते, तरीही कामे करण्यात आम्ही यशस्वी झालो असा दावा पक्षाकडून  केला जातो. विशेष म्हणजे कोट्यावधी रुपयांची कामे झाली तरी भ्रष्टाचाराचे (Corruption) आरोप झाले नाही.

असे असतानाही 2017 च्या महापालिका निवडणुकीत मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पिछेहाट होऊन 40 वरून नगरसेवक संख्या फक्त पाचवर आली. त्या काळात पक्षात मोठ्या प्रमाणात अंतर्गत 'राजकारण' झाल्याचे देखील बोलले जाते. मात्र पाच वर्षात शहरात केलेली कामे नागरिकांपर्यंत पोहोचलीच नाही त्यामुळे नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला संधी दिल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यानंतर आता 2022 ला निवडणूक (Election) होणार होती, मात्र विविध कारणांनी ती  सतत पुढे जात आहे.

यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र निर्माण सेना चांगली कामगिरी करेल या दृष्टीने पक्षप्रमुख राज ठाकरे, युवा नेते अमित ठाकरे यांनी नाशिकवर विशेष लक्ष दिले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये देखील खांदेपालट झाले, काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली, नव्याने 122 शाखाप्रमुखांची नेमणूक करण्यात आली, असे अनेक बदल करण्यात आले असले तरी मागील सुमारे दोन महिन्यांपासून नाशिकच्या महाराष्ट्र निर्माण सेनेत वेगळी शांतता दिसून येत आहे. यामागील कारणे काय आहे ती समजू शकत नसली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे याकडे लक्ष देणार का ? ही  चर्चा सुरू आहे.

शहर, जिल्हाप्रमुखच आघाडीवर

नाशिकच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जिल्हाप्रमुख अंकुश पवार (Ankush Pawar) तसेच महानगर प्रमुख माजी नगरसेवक दिलीप दातीर हेच सध्या ॲक्टिव्ह असल्याचे दिसून येत आहे. मात्र इतर पदाधिकारी व आघाड्या यांचे काम दिसत नाही. दातीर यांनी महापालिकेतील ठेकेदार वॉटर ग्रेस याला चांगलेच अडचणीत आणले आहे. सुमारे 600 कामगारांचा प्रश्न घेऊन मनसेनेने सतत आंदोलन केले आहे तर आता कायदेशीर लढाई देखील सुरू केली आहे. २० फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com