Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआदिवासी तालुक्यात यंदा होळीचा अमाप उत्साह

आदिवासी तालुक्यात यंदा होळीचा अमाप उत्साह

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आजपासून होळी सण ( Holi Festival ) साजरा होणार आहे. जिल्ह्यातील आठ आदिवासी तालुक्यात ( Tribal Talukas )होळीचा उत्साह अमाप संचारला आहे. नवे कपडे घेऊन होलिकोत्सवासाठी आदिवासी बांधव सज्ज झाले आहेत. वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारा हा सण. वसंत ऋतूची सुरुवात आणि हिवाळ्याची समाप्ती या होळीनेच होते.

- Advertisement -

यंदा होळीचा मुहूर्त दुपारी 1:29 वाजता पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून होईल. 18 मार्च रोजी दुपारी 12:47 वाजेपर्यंत पौर्णिमा तिथी आहे. त्यामुळे सायंकाळीच होळी साजरी होईल. सर्वत्र पूजा केली जाईल.

उद्या वीरांची मिरवणूक

होळीच्या दुसर्‍या दिवशी ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत ते वीर मिरवणूक काढतात. त्यांनी यंदा जय्यत तयारी केली आहे. होळीच्या आगीवर घरातले पाणी तापवून त्याने स्नान घालण्याची प्रथा आजह कायम आहे. त्वचेचे रोग नष्ट व्हावेत, यासाठी होळीच्या राखेत पाणी मिसळून तयार झालेला चिखल एकमेकांना लावला जातो. सायंकाळी वीरांची मिरवणूक निघणार आहे.

शहरातून वीर मिरवल्यानंतर टाकांचे रामकुंडावर स्नान घालून विधिवत पूजन होईल. बाशिंगे वीरांची मिरवणूक बुधवार पेठेतील मिरजकर गल्लीतून निघणार आहे. बेलगावकर घराण्याकडे पिढ्यान्पिढ्या चालत आलेली ही अनोखी परंपरा राज्यभरात चर्चेचा विषय आहे. बाशिंगे वीरांची मिरवणूक नाशिक शहरातच निघते.

उत्तर भारतीयांची धूळवड

शहरात धूळवड साजरी होते, त्याच दिवशी शहरातील अंबड, सातपूर या भागातील उत्तर भारतीय होळी म्हणजेच रंगपंचमी साजरी करतात. होळीसाठी औद्योगिक वसाहतीतील काही कारखानेही बंद राहणार आहेत.

चारशे रुपये शेकडा गवर्‍या

होळीच्या पूर्वसंध्येला गौरी पटांगणावर गवर्‍या विकण्यासाठी त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यातून गवरी विक्रेत्यांनी गर्दी केली. एरंडाची फांदी, ऊस या भोवती गोवर्‍या व लाकडे यांचा ढीग रचून होळी पेटवली जाते. त्यासाठी त्र्यंबक व इगतपुरी तालुक्यातून भाड्याने टेम्पो भरून गवर्‍या विकण्यासाठी विक्रेते गौरी पटांगणावर आले. दोनशे ते चारशे रुपये प्रति शेकडा या दराने सध्या गवर्‍यांची विक्री सुरू आहे. मात्र मागणी नसल्यामुळे आपले टेम्पो भाडे तरी सुटेल का, अशी त्यांना भीती आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या