Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याआयकर परतावा भरण्यास मुदतवाढ

आयकर परतावा भरण्यास मुदतवाढ

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयटी रिटर्न फायलिंगना मुदतवाढीचा मागणी करणार्‍या करदात्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे.

- Advertisement -

केंद्र सरकारने आयटीआर रिटर्न भरण्याची मुदत 10 दिवस वाढवली आहे. आता करदात्यांना 10 जानेवारी 2021 पर्यंत आयटी रिटर्न भरता येईल.

दरवर्षी 31 जुलैपर्यंत आयकर विवरण सादर करण्याची मुदत असते. मात्र यंदा करोना संकट आणि त्यात लागू केलेली कठोर टाळेबंदी यामुळे अर्थ मंत्रालयाकडून दोन वेळा मुदत वाढवण्यात आली होती.

31 जुलैनंतर 30 नोव्हेंबर ही अंतिम मुदत होती. त्यात आणखी एक महिन्याची वाढ करून 31 डिसेंबरपर्यंत कालावधी वाढवून दिला होती. मात्र तरीही बहुतांश करदात्यांना विवरण पत्र सादर करण्यात अडचणी येत होत्या.

सोशल मिडियावर मुदतवाढीची मागणी करण्यात येत होती. दिल्लीत झालेल्या बैठकीत 10 जानेवारी 2021 पर्यंत आयटीआर रिटर्न सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्याशिवाय जीएसटीचा वार्षिक रिटर्न भरण्यासाठी 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

अंतिम मुदतीपर्यंत विवारण सादर केले नाही तर 1 जानेवारी 2021 किंवा त्यांनतर रिटर्न फाईल करणार्‍या करदात्यांना विलंब शुल्क भरावे लागणार आहे. ’आयकर कलम 234 एफ’ नुसार हे दंडात्मक शुल्क आकारले जाणार आहे. यात किमान एक हजार ते जास्तीत जास्त 10 हजारांचा भुर्दंड सहन करावा लागेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या