जिल्हा बँक प्रशासकीय मंडळास मुदतवाढ

जिल्हा बँक प्रशासकीय मंडळास मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासकीय मंडळास 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. इतक्या उशिराने आदेश काढण्यामागील सहकार विभागाची भूमिका नेमकी काय असावी याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

मुदतवाढ देण्याचा निर्णय दि.16 फेब्रुवारीला झाला असताना याबाबतचा शासन आदेश मात्र,दि.23 मे 2023 रोजी प्राप्त झाला आहे. इतक्या उशिराने आदेश देण्यामागील नेमके कारण काय याबाबतची चर्चा सहकार विभागात सुरू आहे. जिल्हा बँकेची निवडणूक घेण्याची सहकार विभागाने तयारी करून ऑगस्ट 2021 मध्ये निवडणूक प्रक्रियेस सुरुवात केली होती.मात्र, 27 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने नाशिकसह राज्यातील सात जिल्हा बँकांची आर्थिक परिस्थिती बघत तसेच प्रशासकीय मंडळामुळे पंचवार्षिक निवडणूक 31 मार्च 2022 पर्यत स्थगिती दिली होती. ही मुदत संपुष्टात आल्यानंतर सहकार विभागाने कोणतीही कार्यवाही केली नाही.

जिल्हा बँक प्रशासकीय मंडळास मुदतवाढ
महिन्यातून एकदा पाणीपुरवठा

16 फेब्रुवारी 2023 ला सहकार विभागाने पत्राव्दारे 31 मार्च 2022 ते 30 जून 2023 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला होता. सदर निर्णयानंतर सहकार विभागाने आदेश निर्गमित करणे आवश्यक होते.परंतु, सहकार विभागास आता जाग आली असून 23 मे रोजी सहकार मविभागाने आदेश काढत नाशिक जिल्हा बँकेच्या प्रशासकीय मंडळास 30 जून 2023 पर्यंत मुदत वाढ देत असल्याचे आदेश काढले आहेत. इतक्या उशिराने आदेश काढण्यामागील सहकार विभागाची भूमिका नेमकी काय असावी, याबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com