Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्याजातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती (panchayat samiti) आणि ग्रामपंचायत (grampanchayat) निवडणुकांसाठी (election) उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र (Caste Certificate) सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाचा पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान (State Election Commissioner U. P. S. Madan) यांनी सोमवारी दिली.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) जाहीर केलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारीअर्ज दाखल करण्याचा कालावधी 6 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत होता. तो आता सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढविण्यात आला.

त्याचबरोबर उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जातवैधता पडताळणी समितीकडे (Caste Validity Verification Committee) केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा त्यासंदर्भातील कोणताही पुरावा आणि विहीत नमुन्यातील हमीपत्र सादर करण्यासाठी 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निवडून आल्याच्या दिनांकापासून 12 महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हे हमीपत्र असेल.

उमेदवारी अर्जासोबत जात प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक होते. परंतु राज्य सरकारने 6 डिसेंबर रोजीच्या अध्यादेशान्वये संबंधित कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या सार्वत्रिक किंवा पोटनिवडणुकांकरिता जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 12 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, असेही मदान यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या