मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ

मध्य रेल्वेकडून विशेष गाड्यांना मुदतवाढ

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी (Extra crowd of passengers) लक्षात घेऊन मध्य रेल्वेने ( Centrl Railway ) मुंबई-बलिया/गोरखपूर दरम्यान आधीच चालणार्‍या उन्हाळी विशेष गाड्यांचा ( Special Trains )कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

तपशील खालीलप्रमाणे आहेत

मुंबई - बलिया त्रि-साप्ताहिक विशेष (26 फेर्‍या). ही गाडी (01025) मुंबईतील एलटीटी येथून 1. जुलै ते 29 जुलै दरम्यान 13 फेर्‍या करेल. दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी 14.15 वाजता गाडी सुटेल आणि बलिया येथे तिसर्‍या दिवशी 01.45 वाजता पोहोचेल. तर परतीला ही गाडी (01026) बलिया येथून 3 जुलै ते 31 जुलैदरम्यान 13 फेर्‍या करेल. दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी 15.15 वाजता गाडी सुटेल आणि एलटीटी येथे तिसर्‍या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

दुसरी गाडी मुंबई-गोरखपूर असून ती आठवड्यातून 4 वेळा मिळून 36 फेर्‍या करेल. या गाडीचा नंबर 01027 असून ती एलटीटीहून 2 जुलै ते 31 जुलैदरम्यान 18 फेर्‍या करेल. दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी 14.15 वाजता एलटीटीहून सुटेल आणि गोरखपूर येथे तिसर्‍या दिवशी 02.45 वाजता पोहोचेल. तर परतीला ही गाडी (01028) गोरखपूर येथून 4 जुलै ते 2 ऑगस्टदरम्यान 18 फेर्‍या करेल. दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी 14.25 वाजता ती गोरखपूरहून सुटेल आणि एलटीटी येथे तिसर्‍या दिवशी 03.35 वाजता पोहोचेल.

आरक्षण 24 जून रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणिwww.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com