शिधापत्रिकेवरील मोफत धान्य वितरणास मुदतवाढ

शिधापत्रिकेवरील मोफत धान्य वितरणास मुदतवाढ

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाकाळात Corona उद्योग, व्यवसाय बंद असल्यामुळे हाताला काम नसल्याने अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत Pradhan Mantri Garib Kalyan Yojana जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना Ration Card नोव्हेंबर अखेरपर्यंत मोफत धान्यपुरवठा Free Grain Distribution करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

मात्र या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ दिल्याने याचा लाभ पुन्हा लाभार्थ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 1 लाख 26 हजार मे.टन धान्याचे वाटप करण्यात आले आहे.

करोनाकाळात अनेकजण आर्थिक संकटांचा सामना करत असताना देशातील नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा देण्यात आली होती. हीच सुविधा करोनाच्या दुसर्‍या लाटेमध्येही कायम ठेवण्यात आली. मे आणि जूनमध्ये ही योजना सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांनी गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानातून दिवाळीपर्यंत मोफत धान्य घेतले.

मात्र नोव्हेंबरनंतर काय? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील कार्डधारकांना मोफत धान्याचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात 2609 रेशन दुकानांच्या माध्यमातून रेशनकार्डधारकांना मोफत धान्याचा पुरवठा केला जात आहे. कार्डधारकांना मोफत धान्य वितरण करण्यात आले असून नियमित धान्य तसेच मोफत धान्य एकत्रित दिले जात असल्याने नेमके कोणते धान्य मिळाले याबाबतची संभ्रमावस्था कार्डधारकांमध्ये दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com