Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याShraddha Murder Case : आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 'इतक्या' दिवसांची वाढ

Shraddha Murder Case : आफताबच्या न्यायालयीन कोठडीत ‘इतक्या’ दिवसांची वाढ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

श्रद्धा वालकर (Shraddha Walkar) प्रकरणातील आरोपी आफताब पुनावालाच्या (Aftab Amin Poonawala) न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली आहे…

- Advertisement -

आज आफताबला व्हर्च्युअल कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयात मेहरौली पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी देखील उपस्थित होते.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी तपास सुरु असल्यामुळे आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात यावी, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. पोलिसांच्या मागणीनंतर न्यायालयाने आफताबच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

दरम्यान, याआधी आफताब 13 दिवसांसाठी तिहार तुरुंगात होता. तिहार तुरुंगातून त्याला पोलिग्रॉफ आणि नार्को टेस्टसाठी पाठवण्यात आले होते. आता दिल्ली पोलीस डीएनए आणि FSL रिपोर्टसोबतच सर्व रिपोर्टच्या प्रतीक्षेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या