Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याप्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ

प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी मुदतवाढ

मुंबई । प्रतिनिधी

राज्यातील विविध 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ( Municipal Corporation Elections ) प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर (Voter Lists ) हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी असलेली 1 जुलै 2022 पर्यंतची मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

नाशिक, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या संबंधित महानगरपालिका, त्यांचे संकेतस्थळ आणि ट्रू-व्होटर मोबाईल अ‍ॅपवरही उपलब्ध आहेत. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करण्याची मुदत होती. परंतु ही मुदत आता 3 जुलै 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासाठी रविवार आणि शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीदेखील आवश्यक ती व्यवस्था करण्यात येणार आहे.

हरकती आणि सूचना दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असली तरी प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 9 जुलै 2022 रोजीच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या