Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याअखर्चित निधीवरून अधिकार्‍यांची खरडपट्टी

अखर्चित निधीवरून अधिकार्‍यांची खरडपट्टी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

केंद्र सरकारने Central Government आरोग्य विभाग अंतर्गत मंजूर केलेल्या कोट्यवधींचा निधी अजूनही अखर्चित Unspent Funds आहे.याचा विपरीत परिणाम राज्यांच्या मूलभूत आरोग्यसुविधांवर होत असल्याबद्दल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar यांनी नवी दिल्ली New Delhi येथे घेतलेल्या बैठकीत अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली.

- Advertisement -

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या निधीच्या अनुषंगाने आरोग्य क्षेत्राशी विविध संबंधित कामे तत्काळ हाती घेऊन त्यास पूर्णत्वास नेण्याच्या सूचना डॉ. पवार यांनी केल्या. डॉ. पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि26) महाराष्ट्रातील राष्ट्रीय आरोग्य मिशन अंतर्गत होणार्‍या विविध कार्यक्रमांबाबत आढावा बैठक नवी दिल्ली येथे पार पडली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

बैठकीस आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकारचे सहसचिव तसेच महाराष्ट्र सरकारतर्फे डॉ. रामास्वामी, आयुक्त (आरोग्य सेवा) व मिशन डायरेक्टर, नॅशनल हेल्थ मिशन, महाराष्ट्र सरकार आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत डॉ. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वांतर्गत कोविड महारामारीशी सामना करण्यासाठी जे इसीआरपी (इमर्जन्सी कोविड रिलीफ पॅकेज ) टप्पा-1 तसेच टप्पा-2 आर्थिक साहाय्य मंजूर केले आहे.

त्या अंतर्गत केंद्र शासनाने विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने सर्व कामे तातडीने राज्यस्तरावर पूर्ण करण्याबाबत विस्तारवार सूचना अधिकार्‍यांना दिल्या. बैठकीत डॉ. पवार यांनी 2021-22 साठी मंजूर निधी तसेच 20-21 साठीच्या मंजूर निधीपैकी हजारो कोट्यवधींचा निधी अजून खर्च करण्यात आलेला नाही. यावर अधिकार्‍यांचे प्रकर्षाने लक्ष वेधले. याचा विपरीत परिणाम राज्यांच्या मूलभूत आरोग्यसुविधांवर होत आहे, असे नमूद केले. मंजूर निधीच्या अनुषंगाने विविध आरोग्य क्षेत्राशी संबंधित कामे तत्काळ हाती घेऊन त्यास पूर्णत्वास नेण्यात यावे अशा सूचना डॉ. पवार यांनी केल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या