एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास महागणार

एक्स्प्रेस गाड्यांचा प्रवास महागणार

मनमाड । प्रतिनिधी Manmad

आगामी काळात मेल,एक्स्प्रेस ट्रेनचा Express Train Travell प्रवास महागणार असून रेल्वे प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून सरचार्ज Ticket surcharge घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने Railway Administration घेतला आहे.विमान तिकिटाप्रमाणे मेल आणि एक्स्प्रेसने प्रवाशांना आता तिकिटावर 10 ते 50 रूपये युजर चार्ज द्यावा लागणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली.

एकीकडे अगोदरच पेट्रोल,डिझेलपासून घरगुती गॅस सिलिेंडर आणि इतर जीवनावश्यक वस्तू महागड्या झालेल्या असतांना आता रेल्वेचा प्रवास देखील महाग होणार असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. करोनामुळे रेल्वेला आर्थिक फटका बसून महसूलमध्ये मोठी घट झाली आहे. एकीकडे प्रवाशांना सुविधा कमी पडू नये यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात असून मोठ्या प्रमाणात विकास कामे देखील केली जात आहे.

विमान तिकिटाप्रमाणे मेल आणि एक्स्प्रेस तिकिटावर युजर चार्ज लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून रेल्वे प्रवाशांना प्रति तिकीटावर 10 ते 50 रूपये यूजर चार्ज द्यावा लागणार आहे याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.अगोदर वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण होत चालले त्यात आता रेल्वे प्रशासनाने तिकिटावर सरचार्ज लावण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

तिकीटावर सरचार्ज

विनाआरक्षित - 10 रुपये

सेकंड क्लास -25 रूपये

स्लीपर क्लास 25 रूपये

फर्स्ट क्लास 25 रूपये

एसी चेअर कार- 50 रूपये

थर्ड एसी- 50 रूपये

सेकंड एसी - 50 रूपये

एसी फर्स्ट क्लास विस्टाडोम- 50 रूपये

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com