Good News : सोमवार पासून पश्चिम रेल्वे तर्फे मुंबई सेंट्रल ते भुसावळ दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर एक्सप्रेस

उत्तर महाराष्ट्रातील आमदार खासदारांचे प्रयत्न
Good News : सोमवार पासून पश्चिम रेल्वे तर्फे मुंबई सेंट्रल ते  भुसावळ दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर एक्सप्रेस

भुसावळ Bhusawal

मुंबई सेंट्रल (Mumbai Central) वरून भुसावळ (Bhusawal) जंक्शनसाठी पश्चिम रेल्वे (Western Railway) तर्फे सोमवार पासून नवीन एक्सप्रेस धावणार असुन, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दूरचित्रप्रणाली द्वारे सदर एक्सप्रेसला (Express) हिरवी झेंडी दाखवणार आहे. यासाठी उत्तर महाराष्ट्रातील खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आ.जयकुमार रावल , खा.सुभाष भामरे, खा उन्मेश पाटील, खा.हिना गावीत या लोकप्रतिनीधींनी प्रयत्न केलेत.

भुसावळ बांद्रा टर्मिनस खान्देश एक्स्प्रेसच्या प्रचंड प्रतिसादामुळे खान्देशातील प्रवाशांची खान्देश एक्स्प्रेस दररोज करण्याची मागणी उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी यांच्याकडे होती. परंतु मध्य रेल्वेच्या तांत्रिक अडचणींमुळे सदर गाडीस ट्रक उपलब्ध होत नव्हता परंतु मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे व रेल्वे बोर्ड दिल्ली संयुक्त बैठकीत खासदार श्रीमती रक्षाताई खडसे, आ.जयकुमार रावल व खा.सुभाष भामरे, खा. उन्मेश पाटील खा.हिना गावीत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे आग्रह धरुन पाठपुरावा केला.  दिल्ली रेल्वे बोर्डाने मागणीस नुकतीच संमती देत मुंबई सेंट्रल ते भुसावळ ०९०५१ व भुसावळ ते मुंबई सेंट्रल ०९०५२ हि गाडी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे.

पश्चिम खान्देशच्या प्रवाशांसाठी थेट मुंबई सेंट्रल जाण्यासाठी नविन हंगामी प्रवाशी रेल्वे दि.९ जानेवारी पासुन ३१ मार्च पावेतो प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असुन सदर गाडी रविवार ,मंगळवार व शुक्रवार रोजी रात्री ११.५५ मिनीटांनी मुंबई सेंट्रल येथुन सुटेल प्रवासादरम्यान  बोरीवली भोईसर वापी बलसाड नवसारी चलथान बेस्तान बिने बारडोली व्यारा नवापुर नंदुरबार इ ठिकाणी थांबुन सकाळी ९ वा. दोंडाईचा ९.२८ मि.शिंदखेडा ९.४३ मि.नरडाणा १० वा.अमळनेर १०.४७ मि.धरणगांव ११.१० मि.पाळधी ११.५५ मि.जळगाव व दुपारी १२ वा.भुसावळ येथे पोहोचेल.दोडांईचाहुन सोमवार बुधवार व शनीवारी सायं ५.४० मि.भुसावळ येथुन सुटेल ६.२५ मि.जळगांव ६.४५ पाळधी ६.५८ मि.धरणगांव ७.१८ मि.अमळनेर ७.४४ मि.नरडाणा ८.वा.शिंदखेडा तसेच रात्री ८.१८ मि.दोडांईचा  येथुन सुटेल.

       विशेषत सदर गाडीला प्रचंड मागणी असलेल्या बोईसर वापी येथे थांबा देण्यात आलेला आहे तरी सदर गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com