Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याआयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट; तीन जवानांचा मृत्यू

आयएनएस रणवीर युद्धनौकेवर स्फोट; तीन जवानांचा मृत्यू

मुंबई | Mumbai

मुंबई नेव्हल डॉकयार्ड (Mumbai Naval Dockyard) येथून एक दुर्देवी घटना समोर आली आहे. नौदलाचे जंगी जहाज अशी ख्याती असलेले आयएनएस रणवीर (INS Ranvir) या युद्धनौकेत अचानक स्फोट (blast) झाला आहे….

- Advertisement -

या अपघातात तीन नौसैनिकांचा मृत्यू झाला आहे. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आयएनएस रणवीरच्या इंटर्नल कंपार्टमेंटमध्ये घडली आहे. या घटनेत साहित्याचे फार काही नुकसान झाले नाही. मात्र तीन धाडसी नौदल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

घटनेनंतर जहाज चालवणाऱ्या कर्मचाऱ्यांनी तातडीने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत बचावकार्याला सुरुवात केली. अखेर त्यांना काही काळाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले आहे. तोपर्यंत तीन जवानांचा मृत्यू झालेला होता. आयएनएस रणवीर हे जहाज नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनल तैनातीवर होते. लवकरच बेस पोर्टवर परत येणार होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या