रेड झोन वगळता लॉकडाऊनमध्ये १ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता

मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे संकेत
रेड झोन वगळता लॉकडाऊनमध्ये १ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता

मुंबई

महाराष्ट्रात रुग्ण संख्या आता कमी होऊ लागली आहे. यामुळे अर्थचक्र सुरुळीत करण्याचे नियोजन सुुरु आहे. राज्या 31 मे पर्यंत लॉकडाऊन आहे. 1 जूनपासून त्यामध्ये शिथीलता आणण्याच्या हालचाली सुरु आहे. राज्यातील रेड झोन जिल्ह्ये वगळता इतर ठिकाणी काही शिथीलता देता येण्याची शक्यता आहे, असे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Minister Vijay Wadettiwar) यांनी सांगितले. परंतु राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या बघूनच लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

रेड झोन वगळता लॉकडाऊनमध्ये १ जूननंतर शिथिल होण्याची शक्यता
काळ्या-पांढऱ्या बुरशीनंतर भारतात आता हे नवीन संकट

मुंबईत पत्रकार परिषद घेऊन वडेट्टीवारांनी विविध विषयावर भाष्य केले. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे राज्यातील लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकार रेड झोनमधील जिल्हे वगळता इतर जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याच्या विचारात आहे. पुढच्या पाच ते सहा दिवसात काय परिस्थिती असेल हे पाहून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

अहमदनगरसह ही जिल्हे रेड झोनमध्ये

विजय वडेट्टीवार म्हणाले की, "कालच्या माहितीप्रमाणे राज्यातील 14 जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. अहमदनगर, बुलढाणा, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला,सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली आणि उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश आहे. येथील निर्बंध सरसकट शिथिल करता येणार नाहीत. कन्टेन्मेंट झोन करुन तिथे नियम कडक करावे लागतील तर जिथे रुग्ण संख्या कमी तिथे नियम शिथिल करावे लागतील.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com