कार्लेकर यांच्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन

कार्लेकर यांच्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

पुण्याचे प्रसिद्ध चित्रकार सुबोध कार्लेकर (Painter Subodh Karlekar) यांच्या विविध माध्यमातील चित्रकलेचा अविरत प्रवास नवचित्रकारांना प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार प्रफुल्ल सावंत (Painter Praful Sawant) यांनी केले.

कार्लेकर यांच्या विविध माध्यमातील कलाकृतींचे चित्रप्रदर्शन (Exhibition of works of art) आजपासून 24 एप्रिलपर्यंत कुसुमाग्रज स्मारक (Kusumagraj Monument) येथेे भरवण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन सावंंत बंधू व त्यांचे पिताश्री भि. रा. सावंत यांच्या हस्ते व प्रसिद्ध गायक अविराज तायडे (Singer Aviraj Tayde) यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोेलत होते. लीना कार्लेकर यांनी स्वागत केले. सुबोध कार्लेकर यांनी प्रास्ताविक केले.

तायडे यांनी कार्लेकर यांच्या विविध चित्रकलांचे कौतुक करून हे प्रदर्शन नाशिककरांना (nashik) भावल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला. तीन दिवस सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत चालणार्‍या या प्रदर्शनात कार्लेकर यांंनी पेेन्सिल, कोलाज, ऑईल कलर, बॉलपेनने साकारलेल्या विविध कलांंचे दर्शन होणार आहे. त्यात व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, वास्तूचित्रांचा समावेश आहे. रसिकांनी सदर प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्लेकर यांंनी केले आहे.

Related Stories

No stories found.