Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्यानाशकात आजपासून तोफा, शस्त्रांचे प्रदर्शन

नाशकात आजपासून तोफा, शस्त्रांचे प्रदर्शन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

तोफखाना केंद्राच्या( Artillery Center) वतीने नाशकातील गोल्फ क्लब मैदान येथे दि.18 व 19 मार्च या दोन दिवसीय शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.तोफा आणि शस्त्रांचा साठा गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाला असल्याने परिसराला सैन्याच्या छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

- Advertisement -

काल पहाटे 3 वाजता हा शस्त्रसाठा तोफखाना केंद्रातून निघून गोल्फ क्लब मैदान येथे दाखल झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी गोल्फ क्लब येथे भेट देऊन तोफांची व शस्त्रांची पाहणी केली. यावेळी प्रदर्शनास उद्घाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बंदरे व खनिकर्म तथा पालकमंत्री दादा भुसे,खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी बॅन्ड पथकाचे प्रमुख कर्नल सुनीलचंद्रन यांच्या नेतृत्वाखाली बँड पथक विविध गीतगायन-वादन सादर करणार आहे. तसेच अश्वदलाचे प्रमुख सुभेदार गौरव मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पथक घोडदौडीचे प्रात्यक्षिके करणार असून यामध्ये तुफान,शायनिंग स्टार,मॅक्स या घोड्यांसह साहिबा हि घोडी सामील होणार आहे. सुभेदार कैलास दळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चमू जिम्नेक्स्टिकची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत.

सकाळी 9 ते रात्री 09.30 वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी मोफत खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन लेफ्टनंट कर्नल संतोष पांडा यांनी केले आहे.यावेळी माजी सैनिक व वीर पत्नी यांना काही अडचण असल्यास त्यांच्या तक्रारी दूर करण्यासाठी या प्रदर्शनात स्टॉल लावण्यात येणार असून येथे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. अग्निवीर भरती प्रक्रियेसंदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता देखील याठिकाणी स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.

या तोफांचा समावेश

या प्रदर्शनात बोफोर्स,आधुनिक धनूष, हलकी होवित्झर (एम-777), इंडियन फिल्ड सॉल्टम (155 एम.एम), हलकी तोफ (105एमएम), उखळी तोफ (130 एम.एम), मोर्टार (120 एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम21), लोरोस रडार सिस्टीमसह तब्बल 19 तोफा बघण्याची नाशिककरांना संधी उपलब्ध होणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या