जेईई अ‍ॅडव्हान्स्डची 3 ऑक्टोबरला परीक्षा
USER

जेईई अ‍ॅडव्हान्स्डची 3 ऑक्टोबरला परीक्षा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( Indian Institute of Technology )व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेच्या (JEE Advanced Exams )आधारे प्रवेश दिले जाणार आहेत. जेईई मेन्सच्या कामगिरीच्या आधारे जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता ठरविली जाणार आहे. अशा विद्यार्थ्यांना परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी 11 ते 16 सप्टेंबरदरम्यान नोंदणीची मुदत उपलब्ध असेल. 3 ऑक्टोबरला देशभरातील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे.

जुलैअखेर तिसर्‍या सत्रातील जेईई मेन्स परीक्षा झाली होती, तर चौथ्या व अंतिम सत्रातील जेईई मेन्स परीक्षा गेल्या गुरुवार (ता. 26) पासून सुरू झाली आहे. आता मंगळवारी (ता. 31) तसेच 1 व 2 सप्टेंबरला दोन सत्रांत विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.

या चार सत्रांपैकी सर्वाधिक पर्सेटाईलच्या आधारे विद्यार्थ्यांची जेईई अडव्हान्स्ड परीक्षेसाठी पात्रता निश्चित होणार आहे. यावर्षी आयआयटी, खरगपूर यांच्यातर्फे जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचे संयोजन केले जात आहे.

आयोजन संस्थेने परीक्षेचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. त्यानुसार पात्र विद्यार्थ्यांना 11 ते 16 सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल, तर ऑनलाइन शुल्क भरण्यासाठी 17 सप्टेंबरची मुदत असेल. 3 ऑक्टोबरला परीक्षा घेण्याचे नियोजित असून, ऑक्टोबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत जागा वितरणाच्या प्रक्रियेला सुरुवात होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com