मुंबई | प्रतिनिधी

शिवसेनेचे माजी खासदार आणि शिवसेनेचे सुरुवातीचे शिलेदार माजी खासदार मोहन रावले यांचे निधन झाले. सर्वसामान्याचे नेते ते 'परळ ब्रँड' अशी त्यांची ख्याती होती.

ते ७२ वर्षांचे होते. त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने गोव्यात मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मोहन रावले हे दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते ५ वेळा लोकसभेवर निवडून गेले होते.

मुंबईतील परळ-लालबाग भागातील ते अत्यंत लोकप्रिय नेते होते. शिवसेनाप्रमुख बााळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून रावले यांच्याकडे बघितले जात.