Sunday, April 28, 2024
Homeमहाराष्ट्रआमच्यावर हल्ला झाला तर...; समीर वानखेडेंना धमकी आल्यानंतर क्रांती रेडकरांनी व्यक्त केला...

आमच्यावर हल्ला झाला तर…; समीर वानखेडेंना धमकी आल्यानंतर क्रांती रेडकरांनी व्यक्त केला संताप

मुंबई | Mumbai

समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) आर्यन खान (Aryan Khan Case) केस प्रकरणात २५ कोटींची लाच मागितल्याप्रकरणी त्यांची सीबीआयकडून कसून चौकशी सुरु आहे. समीर वानखेडे हे या प्रकरणात अनेक वेळा चौकशीला सामोरे गेले आहेत. अशातच आता समीर वानखेडे यांना सोशल मीडियावरुन धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे….

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांना फेक ट्विटर अकाउंटवरून (Fake Twitter Account) दाऊदच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. या धमकीत त्यांच्यासह त्यांच्या मुलींचाही या उल्लेख आहे. त्यानंतर आता समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने सातत्याने धमक्या येत असल्याने पोलिसांत तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे.

सलमान खान ते चिरंजीवी… रेल्वे अपघातातवर सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त! चाहत्यांना मदतीचं आवाहन..

क्रांती रेडकर म्हणाली की, “धमक्या देणे, ट्रोल करणे हे खूप आधीपासून होत होते. पण आम्ही दुर्लक्ष करायचो किंवा आम्ही विचार करायचो की त्यांना ब्लॉक करुयात. पण दोन दिवसांपासून वेगळेच सुरू झाले. आता ज्या दोन ट्विटर हँडलवरून धमक्या येत आहेत, त्या वेगळ्या वाटत असून भारतीय ट्विटर हँडल नाहीत, आंतरराष्ट्रीय आहेत, असे तिने म्हटले आहे.

तसेच क्रांती रेडकर पुढे म्हणाली की, ती लोक दाऊदचे (Dawood) नाव घेऊन धमक्या देत असून भारताला शिवीगाळ करत आहेत, भारताच्या सरकारला शिवीगाळ करत आहेत. माझ्या पतीला शिवीगाळ करत आहेत, आमच्या मुलांना शिवीगाळ करत आहेत. आमच्यावर अॅसिड हल्ला झाला तर काय असा विचार मनात येतो. त्यामुळे आम्ही याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहोत असे क्रांती रेडकरने सांगितले.

Video : लाचखोर शिक्षणाधिकारी धनगरकडे सापडलं मोठं घबाड; एसीबी तपासात धक्कादायक माहिती उघड

दरम्यान, सीबीआय आज आर्यन खान प्रकरणी मुंबई हायकोर्टात उत्तर दाखल करणार आहे. तर दुसरीकडे समीर वानखेडे यांना हायकोर्टाने ८ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण दिले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

- Advertisment -

ताज्या बातम्या