समीर वानखेडेंना जीवे मारण्याची धमकी

मुंबई | Mumbai

एनसीबी मुंबईचे (NCB Mumbai) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना जीवे मारण्याच्या धमकी देण्यात आली आहे.

वानखेडे यांना ट्वीटरवरुन धमकीचा मेसेज आला आहे. काही वेळातच हे ट्वीट डिलीटही करण्यात आलं आहे. यासंदर्भात समीर वानखेडे यांनी मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Mumbai Goregaon Police) तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात समीर वानखेडे यांनी गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी समीर वानखेडे यांना धमकीचे ट्विट आले आहे.