मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित
परमबीर सिंग

मुंबई:

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (parambir singh)यांना फरार घोषित करण्यात आले आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केलं आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात सिंग यांना गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात तीन समन्स काढले होते.

त्यानंतरही ते पोलिसांसमोर हजर राहिले नव्हते. सिंग (parambir singh)यांच्यासह रियाज भाटी आणि विनायक सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आलं आहे. अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी कोर्टाचे (एसप्लानेड) न्यायाधीश भाजीपाले यांनी हा निर्णय दिला.

परमबीर सिंग
हार्दिक पांड्या उंची घड्याळांचा शौकिन, पाहा त्याच्याकडचे कलेक्शन

परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. तसेच गोरेगावातील वसुली प्रकरणात अनेक वेळा समन्स पाठवून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, ते हजर झाले नाही. त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभागाने अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी कोर्टात सिंग यांना फरार घोषित करण्याबाबतचा अर्ज दिला होता. कोर्टाने हा अर्ज मंजूर केला आहे. सिंग यांच्यासह रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही कोर्टाने फरार घोषित केलं आहे. हे तिघे 30 दिवसाच्या आत कोर्टासमोर हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.

परमबीर सिंग यांच्याविरोधात एका अधिकाऱ्याने तक्रार केली होती. खोट्या एफआयआरच्या माध्यमातून माझी प्रचंड छळवणूक केली असा आरोप करत पोलिस अधिकाऱ्यानेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत एफआयआर दाखल केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com