Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना CBI...

ICICI बँकेच्या माजी CEO चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना CBI कडून अटक, जाणून घ्या प्रकरण?

दिल्ली | Delhi

आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना आर्थिक अन्वेषण विभागाने (सीबीआय) अटक केली आहे. चंदा कोचर यांनी बँकेच्या धोरण आणि नियमांच्या विरोधात जाऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज दिल्याचा आरोप आहे.

- Advertisement -

विद्यार्थिनीला शिक्षकाने पाठवला अश्लील मेसेज; घरच्यांनी शिकवला चांगलाच धडा, केली यथेच्छ धुलाई

चंदा कोचर या बँकेच्या सीईओ असताना २६ ऑगस्ट २००९ रोजी उद्योगपती वेणुगोपाल धूत यांच्या मालकीच्या व्हिडिओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला ३०० कोटी रुपये आणि ३१ ऑक्टोबर २०११ रोजी व्हिडिओकॉन इंडस्ट्रीज लिमिटेडला ७५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण मंजुर केले होते.

घर खाली करण्यास सांगितल्याने आला राग; भाडेकरूने केले असे काही की…

७ सप्टेंबर २००९ रोजी कर्ज मंजुर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ८ सप्टेंबर २००९ रोजी एनआरएल या कंपनीच्या खात्यात ६४ कोटी रुपये जमा करण्यात आले होते. एनआरएल ही कंपनी चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि वेणुगोपाल धूत यांनी स्थापन केली होती. मुळात व्हिडिओकॉन कंपनीला बँकेंला देण्यात आलेलं कर्ज हे नियमव अटींचे भंग करणारे होते, असं सीबीआयच्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

धुणे धुण्यासाठी गेलेल्या मायलेकींचा पाण्यात बुडून मृत्यू, हृदय पिळवटून घटना

- Advertisment -

ताज्या बातम्या