लखमापूर : साडेदहाला सुरु झाले मतदान; एकाच वार्डात बदलले तीन यंत्र

लखमापूर : साडेदहाला सुरु झाले मतदान; एकाच वार्डात बदलले तीन यंत्र

लखमापूर | वार्ताहर

बागलाण तालुक्यातील लखमापूर ग्रामपंचायतीच्या मतदानाला सकाळी साडेसात च्या सुमारास सुरुवात झाली. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी यावेळी मतदानासाठी गर्दी केली होती. मात्र, अवघ्या सात मतदारांनी मतदान केले आणि मतदान यंत्रात बिघाड झाला. यानंतर काही काल मतदान थांबवावे लागले...

मतदान थांबल्यामुळे केंद्रावर आणि परिसरात मोठी गर्दी मतदार आणि उमेदवारांनी केलेली होती. वार्ड ६ अ मध्ये हा प्रकार घडला. मशिन बंद पडल्याने तलाठी भाऊसाहेब देवकाते व कर्मचार्‍यांची जबरदस्त दमछाक झाली.

यानंतर दुसरे मशिन ९ वाजता आले ते पण चालले नाही मग ९.४५ ला तिसरे मशिन आले. या ठिकाणी फक्त ६९४ मतदार असल्याने तशी अडचण येणार नाही. पण सर्व प्रयत्न करूनही तिसरे मशिन चालले नाही १० वाजता चौथे मागवले गेले. त्यानंतर १०.३० च्या सुमारास मतदानाला याठिकाणी सुरुवात झाली.

सकाळी ९.३० वाजता अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांनी प्रत्यक्ष पाहाणी केली तर पो.नि.गायकवाड यांनी लखमापुरातच ठाण मांडले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com