बालविवाह रोखणे प्रत्येकाची जबाबदारी: बनसोड

बालविवाह रोखणे प्रत्येकाची जबाबदारी: बनसोड

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

ग्रामीण भागात बालविवाह (Child marriage) रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी एकत्र येत काम करावे. अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi workers) किशोरवयीन मुलींचे मेळावे घ्यावे व महिला बचत गटांच्या मासिक सभा (Monthly meetings of women's self help groups), ग्रामसभा (gramsabha) यामध्ये बालविवाह रोखण्यासाठी

प्रबोधन करत लोकसहभागातून बालविवाह थांबवण्यासह बालविवाह करण्याच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी काम करावे, असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Zilha Parishad Chief Executive Officer Lina Bansod) यांनी दिले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात महिला व बालकल्याण विभाग (Department of Women and Child Welfare) आणि युनिसेफ (UNICEF) या संस्थेच्या पदाधिकार्‍यांची संयुक्त बैठक लीना बनसोड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.त्यावेळी त्या बोलत होत्या. महिला व बालकल्याण विभागाच्या एक मूठ पोषण कार्यक्रम, नवजात बालकांची संख्या व कमी वजनाची बालके, सर्वसाधारण वजनाची बालके त्याचबरोबर बाल आधार नोंदणी यासंदर्भात आढावा घेत प्रभावी अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थित बालविकास प्रकल्प अधिकारी (Child Development Project Officer) यांनी यावेळी कशा पद्धतीने बालविवाह रोखले याबाबत सांगितले.

प्रसंग एक

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar taluka) देवगावमध्ये साडेचौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलगी (Minor girl) व साडेवीस वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा विवाह होणार असल्याचे प्रशासनाला कळाले. यावेळी प्रशासनाने तात्काळ देवगाव येथे विवाह स्थळ गाठत हळदीच्या दिवशी अल्पवयीन मुलगा-मुलगी व दोघांचे कुटुंबीय यांचे समुपदेशन (Counseling) करून हा विवाह थांबवण्यात आला असल्याची माहिती त्र्यंबकेश्वरच्या बालविकास प्रकल्प अधिकारी भारती गेजगे (Child Development Project Officer Bharti Gejge) यांनी दिली.

प्रसंग दोन

निफाड तालुक्यातल्या (niphad taluka) तारुखेडले या गावातील 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा (Minor girl) विवाह (Marriage) होत असतांना प्रशासनाने वेळीच दखल घेऊन अल्पवयीन मुलीच्या शाळेत जाऊन जन्म तारखेची पडताळणी केली आणि मुलीसह आई वडिलांचे समुपदेशन करत हा विवाह बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर हा विवाह झाल्यास तुमच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे सांगत समुपदेशन केले आणि हा विवाह थांबवण्यात आला,अशी माहिती निफाड तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी बैठकीत दिली.

त्याचबरोबर युनिसेफच्या सीमा कानोळे यांनी देखील बालकांशी निगडित योजना या कशा प्रकारे राबवाव्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानांकने यासंदर्भात मार्गदर्शन केले. बैठकीसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक चाटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीव म्हसकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ, यूनिसेफ या संस्थेकडून सीमा कानोळे,निफाड बालविकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे आदी उपस्थित होते.

पोलिसांनी बालविवाह रोखला

अंबासन । वार्ताहर | Ambasan

जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात एका मुलीचा बालविवाह होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाव घेत बालविवाह रोखला. अल्पवयीन मुलीच्या आई, वडील व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी समजावून बालविवाह थांबविण्याच्या सूचना करत संबधितांचे प्रबोधन केले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 18) भडाणे, ता. बागलाण येथे अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती जायखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांना मिळाल्याने त्यांनी तात्काळ सदर ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, महिला पोलीस प्रतिमा श्रीखंडे, पोलीस नाईक शरद भगरे यांना रवाना केले.

त्यानंतर पथकाने भडाणे गावी जाऊन अल्पवयीन मुलीच्या आई, वडील व नातेवाईकांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदी समजावून सांगत बालविवाह थांबविण्याच्या सूचना दिल्या. या कारवाईत ग्रामसेवक कोठावदे, पोलीस पाटील महेंद्र भामरे, अंगणवाडी सेविका ज्योत्स्ना पवार, सरपंच प्रमोदिनी भामरे यांनीही बालविवाह प्रतिबंधक समितीचे सदस्य म्हणून अल्पवयीन मुलीच्या आई, वडिलांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या व पोलिसांच्या माध्यमातून बालविवाह थांबविला. कोणीही आपल्या मुला-मुलींना लग्नाचे वय पूर्ण होण्यापूर्वी लग्नासाठी भाग पाडू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

पालकांनी आपल्या मुला-मुलींना वय पूर्ण होण्याअगोदर लग्नासाठी भाग पाडू नये. लग्नासाठी कायद्यान्वये मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण असावे, अन्यथा बालविवाह प्रतिबंध कायद्यातील तरतदींनुसार कारवाई होऊ शकते.

- नवनाथ रसाळ, उपनिरीक्षक, जायखेडा

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com