Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याएसटी अमृतमहोत्सवी वर्षात प्रत्येकाने आधार देण्याचा निर्धार करावा

एसटी अमृतमहोत्सवी वर्षात प्रत्येकाने आधार देण्याचा निर्धार करावा

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्यात रोज 65 लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवासाचा आनंद देणारी एसटी (ST) बुधवार (दि.1) पासून संपूर्ण वर्ष अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. 75 वर्षाची ही आजीबाई टिकवणे ग्रामीण भागातील (rural area) प्रत्येक शेवटच्या माणसाची जबाबदारी आहे. एसटी कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी अमृतमहोत्सवी वर्षात (Amritmahotsavi Varsha) प्रत्येकाने तिला आधार (support) देण्याचा निर्धार करावा एवढीच तिची अपेक्षा आहे.

- Advertisement -

1 जून 1948 साली केवळ 35 बेडफोर्ड गाड्यांवर एसटीची सुरूवात झाली. पहिली एसटी पुणे-नगर या मार्गावर धावली. याच ऐतिहासिक दिवसाची आठवण म्हणून बरोबर 74 वर्षांनी महामंडळाची इलेक्ट्रिक बस (Electric bus) याच पुणे-नगर मार्गावर 1 जूनला धावणार आहे. गेल्या 74 वर्षात एसटीने अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले. दोन वर्ष करोनात (corona), सहा महिने संपात घालविले.

प्रत्येक आंदोलनाच्या (agitation) वेळी, दंंगलीच्या (Riot) काळात तिने दगडफेक (stone pelting) सहन केली. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा या उक्ती नुसार ती आजही गोरगरीबांच्या सेवेत तत्पर आहे.आता एसटीे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. शिवनेरी, विठाई, शिवशाहीसारख्या आरामदायी गाड्या आहेत.नवीन माईल्ड स्टीलच्या बांधणीच्या गाड्या येत आहेत.वातानुकूलित, बिगर वातानुकूलित गाड्या खेड्यांपर्यंत जनसामान्यांची सेवा करत आहे.

1950 रोजी प्रवासी वाहतुकीचे राष्ट्रीयीकरण झाले आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची स्थापना झाली. लाल पिवळ्या रंगाची ओळख सांगणारी एसटी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात राज्याची ध्येयधोरणे घेऊन ग्रामीण जनतेपर्यंत पोहचू लागली. केवळ एसटीमुळेच महाराष्ट्रातील गावं एकमेकांशी जोडली गेली. ग्रामीण भागात जी काही शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहचली ती केवळ लोकवाहिनी एसटीमुळेच. एसटी ग्रामीण जनतेची रक्तवाहिनी झाली. चुल आणि मुल या चौकटीतून मुलींना शिक्षणाच्या दारापर्यंत एसटीने पोहचवले.

आज एसटी समोर खासगी प्रवासी वाहतुकीचे आव्हान आहे. खासगीकरणाचे संकट आहे.तरीही एसटी सामाजिक बांधीलकी टिकवून आहे. ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी, स्वातंत्र्य सेनानी, अपंग, पत्रकार, आजारी व्यक्ती यांना तिकीट दरात सवलती दिलेल्या आहेत. बिरसामुंडा पुनर्वसन प्रकल्पात शरण आलेल्या नक्षलवादी तरुणांना नोकरी, बाळासाहेब ठाकरे शहीद सन्मान योजनेअंतर्गत देशसेवा करताना शहीद झालेल्या वीरपत्नींना एसटीत नोकरी देत आहे.75 वर्षाची ही आजीबाई टिकवणे ग्रामीण भागातील प्रत्येक शेवटच्या माणसाची जबाबदारी आहे. एसटी कायमस्वरुपी टिकवून ठेवण्यासाठी अमृतमहोेत्सवी वर्षात प्रत्येकाने तिला आधार देण्याचा निर्धार करावा एवढीच तिची अपेक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या