Friday, April 26, 2024
Homeजळगावपाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना कुणाची....

पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना कुणाची….

पाचोरा Pachora

शिवसेना कुणाची (Whose Shiv Sena) हे दिसतंय ना, पाकिस्तानला विचारलं तरी ते सांगतील शिवसेना कुणाची पण मोतीबिंदू (Cataracts)झालेल्या निवडणूक आयोगाला ते दिसत नसेल, निवडणूक आयोगाचा (Election Commission) धृतराष्ट्र (Dhritarashtra) झालेला आहे , अशी टीका शिवसेना प्रक्षप्रमुख (Shiv Sena chief) उद्धव ठाकरे यांनी केली. पाचोरा येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

- Advertisement -

सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी एका शेतकऱ्याने लिहिलेल्या कवितेच्या काही ओळी बोलून दाखवल्या. ते म्हणाले

झाल्या असतील तुमच्या वाऱ्या, तर या जरा आमच्या बांध्यावरती
अनाथांच्या नाथा झाल्या असतील तुमच्या वाऱ्या, तर या जरा आमच्या बांध्यावरती
तुमचं सगळं चाललं असेल ओकेमंधी पण आमच्या कापसाला भाव कधी?

मी या शेतकऱ्याला मी मंचावर आणणार होतो, परंतु आणलं नाही कारण, हे सरकार त्याच्यावर कारवाई करू शकतं. कारण या सरकारविरोधात किंवा जर कोणी खरं बोललं की हे सरकार त्याला तुरुंगात डांबू लागलं आहे.

काही जणांना वाटत होतं, ते म्हणजे शिवसेना पण, काही जणांनी सभेत घुसण्याची घोषणा केली होती. निवडणुकीच्या काळात अशा घुशींना मतदानातून उचलून आपटायचं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जळगावच्या अमळनेरमध्ये

४० गद्दार, हरामखोर गेला तर फरक पडत नाही, पण जेव्हा एक विश्वासू माणूस जातो त्यावेळी खड्डा पडतो. वैशाली पाटील यांनी जुनी आठवण सांगितली. महाविकास आघाडीचं सरकारनं नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांना मदत केली आहे. यांच्या अवकाळी सरकारनं शेतकऱ्यानं मदत केली नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सध्या सरकारविरोधात किंवा सत्य बोललं की सरकार लोकांना आत टाकत आहे. आपण त्यांना काही दिलं नव्हतं. आज माझ्याकडे काहीच नाही, शिवसेना नाव चोरलं, धनुष्यबाण चोरलं, वडील चोरत आहेत, तरी देखील तुम्ही आला आहात. तुमचे आशीर्वाद देणारे आहेत त्यामुळं कुणामध्ये हिम्मत आहेत, त्यांनी येऊन दाखवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरणाला मी नक्की येणार..!

आपल्यासमोर भाजप आव्हान हे बिल्कुल नाही. भाजप राज्यात आणि केंद्रात सत्तेवर असेल तोपर्यंत देशाचं होणारं नुकसान कसं भरुन काढायचं हे आव्हान आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सगळे गुलाबो गँग नसतात काही जण संजय राऊतांसारखे मर्द असतात. नितीन देशमुख, राजन साळवी, वैभव नाईक यांच्यामागं चौकशीचा ससेमिरा लावला आहे. आव्हानं कसली देता, आव्हान द्यायला मर्द असायला लागतं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पदरात धोंडा टाकलाभावी पत्नीसोबत व्हीडीओ कॉल करीत तरुणाने घेतला गळफास

मी घरी बसून महाराष्ट्र सांभाळत होतो, म्हणून ही जनता इथं आली आहे. निवडणूक कधी पण लागेल, गद्दारांना तुम्हाला गाडावं लागेल. न्यायदेवता न्याय नक्कीच देईल. राहुल गांधी यांनी अदानींवर प्रश्न विचारले तर त्यांची खासदारकी घालवली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तुम्ही चोरलेलं धनुष्यबाण घेऊन या, मी माझं नाव घेऊन येतो असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं. पावसाळ्यापूर्वी काय आता निवडणुका लावा. मशाल घेऊन येतो. महाराष्ट्र हा गद्दारांचा होऊ शकत नाही ती वीरांचा आहे, असंही ते म्हणाले.

युती तोडण्यासाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा वापर

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचा युती तोडण्यासाठी वापर करून त्यांना पक्षाने दुर फेकले. भाजपात डोईजड होणार्‍या नेत्यांना पक्षातुन बाहेर फेकले जाते.आवाहन देणारे मर्द असावे लागतात माञ हे नामर्द आहेत.मी अडिच वर्षाच्या कार्यकाळात जे काम घरी बसुन केले.ते वणवण फिरून देखिल यांना करता येत नाही.मी हिंदुत्व सोडले नाही.सोडणार नाही.आमचे हिंदुत्व राष्ट्रीय आहे.भाजपाच्या हिंदुत्वाला शेंडा नाही.पाचोर्‍यातील गद्दारांना गाडा असे अवाहन करून राज्य व केंद्र सरकारवर टीकेचे आसूड चालवीत भाषणाचा शेवट केला.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवारांवर कारवाईचा ईशारा

खोके खुर्चा निष्ठा बदलवायला लावतात : सुषमा अंधारे

खोके खुर्चा निष्ठा बदलवायला लावतात.पाचोर्‍याचा आमदार किशोरआप्पा मारू नका गप्पा,तुमच्यावर आहे गद्दारीचा ठप्पका.पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी बालकासारखे वागु नये.नवनित राणांनी यांनी हनुमान चालीसा वाचण्याची ट्युशन लावावी.खारघर सोहळ्या दरम्यान उष्मघातात मृत्यु पावलेले,उ.प्र.मध्ये करोनात मृत्यु पावलेल्यांची प्रेते गंगेत तरंगत ठेवणारे मुख्यमंत्री आदित्य योगीनाथांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी राज ठाकरे यांनी का केली नाही. अशा चौफेर टिका करत महाराष्ट्रातला विधायक दिशा आणि खान्देशचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंची ही सभा असल्याचे त्या म्हणाल्या.

आजचा दिवस माझ्यासाठी वेदना आणी आनंदाचा : वैशालीताई सुर्यवंशी

वैशालीताई सुर्यवंशी भाषणात म्हणाल्या की, आजचा दिवस माझ्यासाठी वेदना आणी आनंदाचा समिश्र दिवस आहे. उध्दव साहेबांची सभा होत असल्याचा आनंद आहे. तात्यासाहेब निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जगले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,उध्दव ठाकरे साहेब यांचे ते प्रामाणिक पाईक होते.पक्ष सोडुन जे गेले ते इतिहासाची जिर्ण पाने आहेत. तर नवे शिवसैनिक धगधकगता सुर्य आहे.उद्याची पहाट आपली असुन येणार्‍या काळात महाराष्ट्रात उबाठा सेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही.गतकाळात तात्यांच्या शिवसेना प्रवेशाने पाचोर्‍याच्या शिवसेनेला उर्जा आणि दिशा मिळाली.

आमदारकीच्या 10 वर्षातच्या काळात मतदार संघात भगवा डौलाने फडकवत विकासाची घौडदौड सुरू ठेवली होती. तात्यांनी त्यांच्या घरात नगराध्यक्षपद आणि आमदारकी दिली. मात्र कृतज्ञता नसणार्‍यांनी बाळासाहेबांची शिवसेना सोडुन उध्दव ठाकरेंच्या पाठित खंजिर खुपसला हे तात्यांना असहय्य झाले असते. परंतु तात्यांचा वारसा,विचारधारा मी सोडणार नाही.उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मी राजकारणात सक्रिय झाली आहे.

जनतेचे प्रेम,आर्शिवाद मला उर्जा देतात.शेतकरी प्रश्न गोरगरिबांच्या हक्कासाठी झटेल.फुटीचे राजकारण करणार नाही.तात्यांनी जसे काम केले.तसे काम करण्याचे वचन दिले.शिवसेनेशी गद्दारी करणार्‍याना धडा शिकवण्यासाठी जिंके पर्यंत लढण्याचे आवाहन केले.

हे काळ्या पायाचे सरकार : विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे

महाराष्टात शेतकर्‍याचे प्रश्न कायम आहेत.कापसाला भाव नाही.केंद्र व राज्य सरकार शेतकरी विरोधी आहे.नैसर्गिक आपत्तित राज्य सरकारने शेतकर्‍याच्या नुकसानीचे अनुदास दिले नाही.यांच्या राजवटीत शेतकरी आत्महत्या होत असुन हे काळ्या पायाचे सरकार आहे.

पाचोरा नगरी ही निष्ठावंत शिवसैनिकांची : खा.संजय राऊत

पाचोर्‍याच्या सभेत प्रचंड जनसमुदाय पाहता पुढचा निकाल स्पष्ट झाला आहे.पाचोरा नगरी ही निष्ठावंत शिवसैनिकांची आहे.जळगाव सुवर्ण नगरी आहे पण येथे काही दगड निपजले त्यांनी शिवसेनेच्या नांदी लागु नये.जळगाव जिल्ह्यात गुलाबो गँग आहे.50-50 घेणार्‍याचा बंदोबस्त करा.जिल्ह्यात लोकसभा- विधानसभेवर भगवा फडकणार आहे. सुत्रसंचलन नाना वाघ यांनी आभार अ‍ॅड.अभय पाटील यांनी मानले.

उद्धव ठाकरे यांच्या पाचोरा येथील सभेवर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, उद्धवजी, आपण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा एकेरी उल्लेख करीत म्हणालात की, ‘‘ मोदीच्या मागे- पुढे कुणी नाही‘‘ 

आपण हे विसरलात की, आदरणीय मोदीजींच्या सोबत देशातील कोट्यवधी जनतेचे आशीर्वाद आहेत. हा देशच त्यांचे कुटुंब आहे. लहानपणीच कुटुंबाचा त्याग केलेल्या माणसाला कुटुंबाचा मोह कसा राहणार? कुटुंबाच्या मोहात तर तुम्ही अडकला आहात. म्हणूनच तुमच्या जवळची माणसे सोडून गेली आणि तुमची ही गत झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या