परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच; खा.राऊतांंचा केंद्र, राज्य सरकारवर हल्लाबोल

परवानगी नाकारली तरी मोर्चा निघणारच; खा.राऊतांंचा केंद्र, राज्य सरकारवर हल्लाबोल

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान करणार्‍या राज्यपाल कोश्यारी (Governor Koshyari) यांच्यावर कारवाईसह महागाई (inflation) तसेच राज्यातील व देशातील इतर विविध मागण्यासाठी मुंबईत (mumbai) महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) मोर्चा निघणार आहे.

आतापर्यंत पोलिसांनी (police) परवानगी (permission) दिलेली नसली तरी पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही मोर्चा निघणारच अशी माहिती शिवसेनेचे (shiv sena) ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी दिली. नाशिकमध्ये (nashik) आलेल्या खा. राऊत यांनी पत्रकारांची संवाद साधला, यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी करत केंद्र तसेच राज्य सरकारवर हल्लाबोल केला.

मुंबई, ठाणे, नाशिक आदी महापालिका निवडणुकीसाठी (election) आम्ही तयार आहोत. मात्र राज्यातील या घटनाबाह्य सरकारची निवडणुका घेण्याची मानसिक नाही. त्यांना पराभवाची भीती असल्याचे अंधेरीच्या पोटनिवडणुकीने दाखवून दिल्याची टीका ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली. तसेच फ्रॅक्चड फ्रीडम (Fractured Freedom) या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी जाहीर झालेला पुरस्कार रद्द करणे हे लोकशाहीला (Democracy) धरुन नसून ते घातक असल्याची टीकाही त्यांनी केली.

सुषमा अंधारे यांच्या जुन्या व्हिडिओबाबत वारकरी संप्रदायाचे नेते बोलत आहेत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमानावर ते का बोलले नाहीत. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) सातत्याने वारकरी संंप्रदायाबरोबर राहिले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी वारकरी संप्रदायाचा अवमान कधीही केलेला नाही आणि करणार नाही, आमच्या स्वप्नातही तसे येणार नाही. मात्र गेल्या काही वर्षापासून सातत्याने जे लोक व पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर नाही, म्हणजे ते हिंदुत्ववादी नाहीत असे भासवत टिका केली जात आहे.

आमची या संदर्भात वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांशी चर्चा सुरू आहे. याबाबत सुषमा अंधारे यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे.महापुरुषांबद्दल अवमानकारक बोलणार्‍या राज्यपालांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसतात. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी, प्रसाद लाड, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा आदींवर भाजपने कारवाई का केली नाही याविरोधात दि.17 डिसेंबरला राज्यात विराट मोर्चा काढणार आहोत.

सीमावर्ती भाग केद्रशासीत करावा

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भाग केद्रशासीत करावा, गृहमंत्र्यांना याबाबतचे अधिकार आहेत. ते तसे करु शकतात. जरअसे झाले तर आपण मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्र्यांचे देखील स्वागत करु असे खा. राऊत म्हणाले

तोंडाला कुलूप का ?

राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांपासून इतर महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने केली जात असताना या राज्यकर्त्यांच्या तोंडाला कुलूप का लागले आहे. यावर कारवाई करण्याचे सोडून तुम्ही नागपूरमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात. बच्चू कडू कोणावरही टीका करू शकतात, उद्या आमचें सरकार आले तर ते आमच्या पुढे असतील, असे अनेक लोक आहेत, ते असे पुढे पुढे जायचे काम करतात.अशी टिका राऊत यांनी केली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com