नाशिकच्या 'या' कंपनीत कोट्यावधींची युरोपीय गुंतवणूक

न्यूज अपडेट/News Update
न्यूज अपडेट/News Updateन्यूज अपडेट/News Update

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सह्याद्री फार्म्स पोस्ट पोस्ट हार्वेस्ट केअऱ लि. या कंपनीमध्ये रू.३१० कोटींची थेट परकिय गुंतवणूक युरोपातील गुंतवणूकदारांच्या समूहाने केली आहे. इंकोफिन (Incofin), कोरीस (Korys), एफएमओ (FMO) आणि प्रोपार्को (Proparco) यांचा या गुंतवणुकदारांमध्ये समावेश आहे. शेतकऱ्यांना आपला व्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत स्वरूपात चालविण्याच्या सहयाद्री फार्म्सच्या भूमिकेवर या गुंतवणूकीमुळे शिक्कामोर्तब झाले आहे...

छोट्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत (एंड -टू -एंड) सहाय्य प्रदान करणारे सह्याद्री फार्म्स हे ग्रामीण उद्योजकतेचे उत्तम उदाहरण आहे. सन २०१० मध्ये दहा शेतकऱ्यांच्या छोट्या गटाने एकत्र येत द्राक्षे युरोपात निर्यात केली.

हाच छोट्या शेतकऱ्यांचा समूह आज सह्याद्री फार्म्सच्या रुपाने भारतातील आघाडीची फळे आणि भाजीपाला निर्यात आणि प्रक्रिया करणारी कंपनी बनली आहे. नऊ पिके, १८ हजार शेतकरी आणि ३१ हजार एकरहून अधिक क्षेत्रावर सह्याद्री फार्म्सचा विस्तार झाला आहे.

संलग्न शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या पिकांची निवड करण्यापासून पीक पद्धतीचे मार्गदर्शन, शेतकरी वापरत असलेल्या कृषी निविष्ठा (इनपूट्स), पीक काढणी आणि विक्री या सर्व टप्प्यांवर सह्याद्री फार्म्सची साथ असते.

या प्रक्रियेत सह्याद्रीने फार्म्सने एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना उच्च-उत्पन्न देणार्‍या पिकांच्या जाती, बियाणे, खते, कीडनाशके आदी कृषी निविष्ठा, प्रत्यक्ष (रिअल टाइम) हवामानाची माहिती आणि कृषिमाल बाजारपेठेत नेण्यापर्यंतची इत्थंभूत माहिती पुरविण्यात येते.    

सह्याद्री फार्म्समुळे छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक व सामाजिक परिवर्तन होत आहे. नामदेव पवार हे त्यातलेच एक शेतकरी आहेत. ते सांगतात, ‘‘२०१२ मध्ये मी जवळपास शेतजमीन विकण्याचा निर्णय घेतला होता. अशा वेळी सह्याद्रीने मला आधार दिला व पुन्हा शेती व्यवसाय करण्यासाठी मी प्रेरीत झालो. सह्याद्रीमुळे माझ्या उत्पन्नात वाढ झाली. २०१४ मध्ये मी बँकेचे कर्जही फेडले.

सह्याद्री फार्म्सशी संलग्न असलेल्या अनिल डावरे यांचाही असाच अनुभव आहे. ते सांगतात, माझ्याकडे एक एकरपेक्षा कमी शेती आहे. माझ्या शेतजमिनीच्या एका भागात घर आणि जनावरांचा गोठा आहे. सह्याद्रीसोबत जोडला जाऊन शेती केल्याने मी यशस्वी ठरलो. मुलाने उत्पादित केलेला शेतमाल परदेशात निर्यात होऊ शकतो, अशी माझ्या आईवडिलांनी कधीही कल्पना केली नव्हती. मात्र ते शक्य झाल्यानंतर त्यांच्या आनंदाला सीमा उरली नाही.

कोरीस, एफएमओ, प्रोपार्को आणि इंकोफिन यांच्याकडून सह्याद्री फार्म्समध्ये केली जाणारी भांडवली गुंतवणूक ही शेतकऱ्यांच्या कंपनीची आणखी वाढ करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. सह्याद्री फार्म्सला प्रक्रियायुक्त फळे आणि भाजीपाला उत्पादनांची आपली क्षमता वृद्धींगत करायची आहे तसेच प्रक्रियापश्चात कचऱ्यापासून वीज निर्माण करण्यासाठी बायोमास प्लांट आणि पॅकहाऊससारख्या पायाभूत सुविधा वाढवायच्या आहेत.

त्यासाठी या गुंतवणुकीचा उपयोग केला जाईल. गुंतवणुकीच्या या प्रक्रियेत ‘अल्पेन कॅपिटल’ने सह्याद्री फार्म्ससाठी विशेष धोरणात्मक सल्लागार (स्ट्रँटेजिक ॲडव्हायजर) म्हणून काम केले.

शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांना उद्योजकांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या विचारप्रवृत्त करणे ही सह्याद्री फार्म्सची मूळ संकल्पना आहे. प्रत्येक लहान आणि सीमान्त शेतकऱ्यांसाठी शेती फायदेशीर आणि व्यावहारिक व्यवसाय बनावा या उद्देशाने आम्ही एक शाश्वत, मोठ्या प्रमाणात वाढ होण्यासाठी सक्षम अशी संस्था विकसित करीत आहोत.’

- विलास शिंदे, संस्थापक (शेतकरी) आणि व्यवस्थापकीय संचालक, सह्याद्री फार्म्स.

इंकोफिनला गुंतवणूकदार संघाचे आणि सह्याद्री फार्म्स सोबतची भागीदारी विकसित करण्यासाठीचे नेतृत्त्व करताना अभिमान वाटतो आहे. भागीदारी आधारित दृष्टिकोनातून विकसित झालेल्या सह्याद्री फार्म्सच्या संकल्पनेचा कृषी क्षेत्रात वैश्विक रोल मॉडेल म्हणून प्रसार व्हावा, ज्यातून शाश्वत आर्थिक परिणाम, हवामान बदलासाठी अनुकूलन आणि ग्रामीण समुदायात सर्वसमावेषक विकास साध्य करताना शेती क्षेत्र तंत्रज्ञान आधारित आणि जागतिक स्पर्धाक्षम व्यवसाय होईल.

- राहुल राय, पार्टनर (इंकोफिन इंडिया)

भारतातील छोट्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी सह्याद्री फार्म्सच्या रुपाने दीर्घकालीन भागीदार मिळाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. शेतकर्‍यांना त्यांचा व्यवसाय भरभराटीस आणण्यासाठी कोणती मदत आवश्यक आहे हे ओळखून ती मदत करण्याच्या सह्याद्री फार्म्सच्या क्षमतेने आम्ही प्रभावित झालो आहोत. भारतातील शेतकऱ्यांचे नेतृत्त्व करणाऱ्या एका संस्थेमध्ये झालेली ही पहिली आंतरराष्ट्रीय भांडवली गुंतवणूक आहे. सह्याद्री फार्म्सला आणखी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास आणि कृषी उद्योगाच्या पुढील वाढीसाठी ‘ब्लू प्रिंट’ तयार करण्यात नक्कीच उपयुक्त ठरेल.

मायकेल जोन्गेनील, मुख्य कार्यकारी अधिकारी, एफएमओ.

फळे आणि भाजीपाला क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यावसायिकांपैकी एक असलेल्या सह्याद्री फार्म्सचा इंकोफिन, कोरीस आणि एफएमओ यांच्याप्रमाणे भागधारक बनल्याचा ‘प्रोपार्को’ला अभिमान आहे. ही गुंतवणूक अभिनंदनीय आहे. जबाबदार दृष्टिकोनासाठी वचनबद्ध असलेल्या अग्रगण्य भारतीय कृषी कंपनीतील या गुंतवणुकीमुळे अनेक सकारात्मक सामाजिक आणि पर्यावरणपूरक परिणाम होणार आहेत. सुरुवातीला जवळपास १५ हजार शेतकरी आधुनिक पुरवठा साखळीत प्रवेश करण्यासाठी सक्षम होतील. ज्यामध्ये पुनर्निर्मित शेती पद्धती आणि दर्जेदार उपकरणे उपलब्ध होतील. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादने आणि त्यांची गुणवत्ता वाढवता येईल, शेतीचे नुकसान कमी होऊन आणि कीटकनाशके आणि खतांचा वापर कमी होईल. हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठीच्या ठोस उपाययोजना राबविण्यासाठी सह्याद्री फार्म्स या गुंतवणुकीमुळे सक्षम होईल. शिवाय अक्षय (पुनर्निर्मित) ऊर्जा उत्पादनातील आपला हिस्सा ५० टक्क्यांहून अधिक वाढवून शेवटी शून्य कचरा (झीरो वेस्ट) धोरणाची अंमलबजावणीही शक्य होईल. 

फ्रँकोइस लोम्बार्ड, मुख्य कार्यकारी अधिकारी, ‘प्रोपार्को’

सह्याद्री फार्म्सचे भागीदार होताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे कारण हे असे शाश्वत मॉडेल आहे की ज्यात शेतकरी समुदाय आणि पर्यावरणविषयक जागरुकता यावर भर दिला आहे. सह्याद्रीची वाटचाल शेतकरी ते उद्योजक बनण्याच्या एका प्रेरक कहाणीत गुंफलेली आहे. ज्यांनी अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करुन पारंपरिक भारतीय शेतीचे रूपांतर करण्याचा दृष्टीकोन अंगिकारला आहे. सह्याद्रीचे संस्थापक आणि मॅनेजमेंट टीम प्रगत डिजिटल सोल्यूशन, व्यावसायिक वैविधतेने परिपूर्ण अशा परिपूर्ण कृषी मूल्यसाखळीत पारदर्शकता आणण्यात आणि मुख्यत्वे शेतकऱ्यांच्या नेतत्वाखालील शेतकऱ्यांची कंपनी म्हणून विकसित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

- हरी सुब्रमण्यम, पार्टनर (कोरीस, इंडिया)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com