शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यगटाचे अध्यक्ष
शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना

मुंबई। प्रतिनिधी Mumbai

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात (National Education Policy)नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)यांच्यासह सहा मंत्र्यांचा समावेश आहे.

राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात स्वायत्तता आणि उत्कृष्टता सक्षम करणे, शाळांपासून कौशल्य विकास तसेच उच्च आणि तांत्रिक शिक्षणापर्यंतच्या सर्व शैक्षणिक बाबींवर लक्ष केंद्रित करणाऱ्यासाठी हा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. राज्य स्तरावरील सर्व शिक्षण संस्था आणि विभागांना, पूर्व-प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षण संस्थांपर्यंत यशस्वी होण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मधील दृष्टिकोनानुसार, गुंतवणूक आणि संसाधने यांचा मेळ घालण्यासाठी तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी या कार्यगटाची स्थापना करण्यात आली आहे.

या कार्यगटाचे अध्यक्ष मुख्यमंत्री असून सदस्य म्हणून उपमुख्यमंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री, शालेय शिक्षण मंत्री, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास व्यवसाय मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच कृषी मंत्री यांचा समावेश करण्यात आला आहे. तर उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव कार्यगटाचे सदस्य सचिव आहेत.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सक्षम सनियंत्रणासाठी म्हणून हा कार्यगट काम करेल. डॉ. माशेलकर समितीच्या शिफारशींनुसार विविध विषयांवर स्थापन करण्यात येणाऱ्या समित्यांच्या कामकाजाचा वेळोवेळी आढावा घेणे आणि धोरणाच्या अनुषंगाने होणाऱ्या नवनवीन बदलांबाबत चर्चा, विषय समित्यांच्या अहवालातील शिफारशींनुसार विभागामार्फत करण्यात आलेल्या किंवा करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा आढावा घेणे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षणात करावयाचे बदल याविषयी धोरणात्मक चर्चा करणे, अशी या कार्यगटाची कार्यकक्षा असणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com