Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यारोजगार निर्मितीसाठी जिल्हा कार्यकारी समिती स्थापनार : टोपे

रोजगार निर्मितीसाठी जिल्हा कार्यकारी समिती स्थापनार : टोपे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

राज्यभरात कौशल्य रोजगार (Skills employment), उद्योजकता नावीन्यतेस प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्ंया अध्यक्षतेखाली कौशल्य (Skill), रोजगार (employment), उद्योजकता (Entrepreneurship) व नावीन्यता जिल्हा कार्यकारी समिती (District Executive Committee) स्थापन करण्यात येत असल्याचे विभागाचे मंत्री राजेश टोपे (Minister Rajesh Tope) यांनी जाहीर केले.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीत उपाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Chief Executive Officer of Zilha Parishad) हे असतील. त्याचबरोबर महापालिका आयुक्त (महापालिका आयुक्त,), नगरपालिकेचे मुख्याधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक, कृषी विज्ञान केंद्राचे प्रतिनिधी, स्थानिक आयटीआयचे प्राचार्य, यांच्यासह महिला आर्थिक विकास महामंडळ व उमेद अभियानाचे प्रतिनिधी, खासगी इन्क्युबेशन सेंटरचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील मान्यताप्राप्त स्टार्टअपचे प्रतिनिधी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी या समितीवर सदस्य असणार आहेत.

या समितीचे मुख्य उद्दिष्ट्य हे उद्योग केंद्रीत कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि नवउद्योजक घडविणे हे राहणार आहे. त्याचबरोबर स्टार्टअप संकल्पनेचा विकास (Development of startup concept) करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालय, आयटीआयमध्ये (ITI) नाविन्यता कक्षाची स्थापना करून त्याद्वारे जिल्ह्यातील नवउद्योजक तसेच स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी मार्गदर्शन करणे हे राहणार आहे.

जिल्ह्याच्या खरेदी प्रक्रियेत स्टार्टअपना (Startup) प्राधान्य देण्यास सहकार्य करण्यात येईल. त्यांना गुणवत्ता चाचणी, पेटंटसाठी साह्य केले जाईल. महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक महाविद्यायात महिला उद्योजकता कक्षाची स्थापना करून त्याद्वारे सर्व स्तर व वयोगटातील महिलांना उद्योजकतेसाठी मार्गदर्शन व आवश्यक ते साहाय्य या समितीच्या माध्यमातून करण्यात येईल. जिल्ह्यामध्ये कौशल्य व रोजगाराभिमुख तसेच नाविन्यतेच्या योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी गौरवपूर्ण कामगिरी करणार्या व्यक्ती, संस्थांना ही समिती सन्मानपत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येईल.

मोठ्या उद्योगांशी चर्चा करून त्याप्रमाणे आयटीआयमध्ये सुसंगत प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम लागू करणे, कामगार बाजाराचा कल ओळखणे, रोजगाराची मागणी, पुरवठा यांचा आढावा घेणे, ग्रामीण स्तरावरील स्थानिक कौशल्ये तसेच नवीन संकल्पना शोधून त्यांना प्रोत्साहन देणे, महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी हिरकणीसारखे कार्यक्रम आयोजित करणे, असे विविध उपक्रम या समितीच्या माध्यमातून राबविले जाणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या