आस्थापना खर्च 35 टक्केपेक्षा कमी; मनपात भरती शक्य

jalgaon-digital
2 Min Read

नाशिक । प्रतिनीधी | Nashik

नाशिक शहराचा (nashik city) झपाट्याने विकास होत आहे. यामुळे नवनवीन वस्त्या तयार होऊन नागरिक राहायला येत आहे. अशा वेळेला त्यांना महापालिकेच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या सुखसुविधा मिळाव्यात, यासाठी मनुष्यबळाची गरज आहे.

मात्र मागील सुमारे 24 वर्षांपासून नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) भरती प्रक्रिया (Recruitment process) न झाल्यामुळे महापालिकेत आहेत त्या अधिकारी व सेवकांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. महापालिकेत 3 हजारांहून अधिक पदे रिक्त (Vacancies) आहे.

नाशिक महापालिकेत 3038 पद रिक्त (Vacancies) असून अपुर्‍या मनुष्य बळामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. मात्र नोकरभरती (Recruitment) करण्यासाठी आस्थापना खर्च हा 35 टक्केच्या आत असावा लागतो. सध्या हा खर्च 33.2 टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे महापालिकेला नोकरभरती करता येणार आहे. महापालिकेच्या सभाग्रहात महासभेत नोकर भरतीच्या ठराव प्रस्ताव एकमताने मंजूर होऊन देखील आस्थापना खर्च 35 टक्के पेक्षा जास्त असल्यामुळे महापालिकेत नोकर भरती होऊ शकली नव्हती.

नाशिक महापालिकेत (Nashik Municipal Corporation) 2020-21 आर्थिक वर्षात आस्थापना खर्च सुमारे 38 टक्केपर्यंत पोहोचला होता. यामुळे नाशिक महापालिकेत महापौर सतीश कुलकर्णी (Mayor Satish Kulkarni) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष महासभेत नोकरभरती प्रस्ताव एकमताने मंजूर होऊन देखील नोकर भरती होऊ शकली नव्हती. 14 मार्च 2022 पासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे.

यामुळे पदाधिकार्‍यांना देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या सुविधा कमी करण्यात आले आहेत. कार्यालयातील विद्युत बिल (Electricity bill) त्याचप्रमाणे गाड्यांच्या इंधन बचत (Fuel saving) झाली आहे. नवीन आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार (Commissioner and Administrator Ramesh Pawar) यांनी काटकसरीचे धोरण अवलंबिले आहे तसेच वसुलीकडे विशेष लक्ष दिल्याने पाणीपट्टी (water tax), घरपट्टी (house tax) वसुली वाढीचे प्रयत्न चालविले आहे.

रिक्त पदे :

महापालिकेत 7717 पद मंजूर असून त्यातील प्रत्यक्षात मात्र 4679 कर्मचारी कार्यरत आहेत. तर 3038 पद मात्र रिक्त आहे.अ 159, ब 49, क 1472 तर ड वर्गवारीत 1205 इतकी पद रिक्त आहेत. त्यात डॉक्टर, इंजिनियर, लिपीक, अशा अनेक महत्वाच्या पदावर कामांसाठी लोक नाहीत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *