tokyo olympics तांत्रिक बिघाडामुळे भारताला गमवावे लागले पदक

आज दिवसभरात काय घडलं
tokyo olympics तांत्रिक बिघाडामुळे भारताला गमवावे लागले पदक

टोकियो

ऑलिम्पिक २०२०च्या (tokyo olympics) दुसऱ्या दिवशी भारतासाठी निराश करणारी बातमी आली आहे. 10 m Pistol प्रकारात भारताची युवा नेमबाज मनू भाकेरला(manu bhaker) पदकाच्या शर्यतीमधून बाहेर व्हावं लागलं. यासाठी कारण ठरलं ते म्हणजे पात्रता फेरीत मनू भाकेरच्या पिस्तुलमध्ये झालेला तांत्रिक बिघाड.

tokyo olympics तांत्रिक बिघाडामुळे भारताला गमवावे लागले पदक
Tokyo Olympics 2020 : भारताचे पदकाचे खाते उघडले

टोकियो ऑलिम्पिकच्या दुसऱ्या दिवशी महिला १० मीटर एअर पिस्तूल (Pistol)पात्रता फेरीत भारताच्या दोन्ही खेळाडूंना अपयश आले. काल पुरुषांच्या नेमबाजीत आलेल्या अपयशा पाठोपाठ आज महिलांकडून देखील निराशा झाली. मोक्याच्या क्षणी पिस्तूल खराब झाल्यानंतरही मनू भाकेरने दमदार पुनरागमन करत ६० शॉट्समध्ये ५७५ गुणांची कमाई केली. परंतु पदकांच्या शर्यतीतून ती बाहेर फेकली गेली. मनू भाकेरकडून भारताला पदकाची आशा होती, परंतू तांत्रिक बिघाडामुळे हे पदक भारताच्या हातातून निसटलं आहे. पिस्तुलात झालेल्या बिघाडामुळे मनू भाकेरची ६ मिनीटं वाया गेली, ज्याचा फटका तिला बसला.

पात्रता फेरीला सुरुवात झाल्यानंतर मनू भाकेरने (manu bhaker)चांगली सुरुवात केली. पहिल्या १० शॉट्समध्ये मनूने आपल्या नावावर ९८ गुण जमा केले. १६ शॉट्सनंतर मनूचा स्कोअर १५६ असा होता. परंतू यानंतर मनूला आपल्या पिस्तुलात काहीतरी बिघाड झाल्याचं लक्षात आलं. मनूने ही बाब आपले कोच रौनक पंडीत यांच्या लक्षात आणून दिली. यानंतर तिने तात्काळ ही बाब ज्युरी मेंबर्सना सांगितली. मनूच्या पिस्तुलातील लिव्हरचा पार्ट तुटला होता. ज्यामुळे बॅरल बाहेर येत नसल्यामुळे तिला पॅलेट्स लोड करता येत नव्हत्या.

ज्युरी मेंबर्सशी झालेल्या चर्चेनंतर मनूला पिस्तुल बदलण्याची परवानगी देण्यात आली. मनूने तात्काळ आपली पिस्तुल बदलली, परंतू दरम्यानच्या काळात तिची ६ मिनीटं वाया गेली, ज्याचा परिणाम तिच्या कामगिरीवर झाला.

आज दिवसभरात काय घडलं

सानिया-अंकिताचा खेळ खल्लास!

भारताचा स्टार टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि अंकित रैनाला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिला दुहेरीत या दोघींनी पहिला सेट 6-0 असा जिंकत धमाकेदार सुरुवात केली. दुसऱ्या सेटमध्ये ही जोडी 5-3 अशी आघाडीवर होती. मात्र या सामन्यात त्यांना 6-0, 6-7, 8-10 असा पराभव स्वीकारावा लागला.

जिम्नॅस्टिक : प्रणती नायकची ऑलिम्पिक यात्रा समाप्त

भारताची आर्टिस्टिक जिमनास्ट प्रणती नायक ऑल राउंड फाइनल्ससाठी पात्रता फेरी पार करु शकली नाही. चारही कॅटेगरीमध्ये मिळून तिचा स्कोर 42.565 इतकाच होता. ती दुसरे सबडिविजनमध्ये 29 व्या रँकवर होती. दरम्यान टॉप 24 खेळाडूच ऑलराउंड फायनलमध्ये जात असल्याने प्रणती स्पर्धेबाहरे गेली आहे.

रोविंग :पुरुषांच्या लाइट डबल्स स्कल्स रिपॅजे प्रकारात अरविंद सिंग आणि अरुणलाल सिंग सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. या जोडीने लाइटवेट पुरुष दुहेरीतील स्कल के रेपेचेज राउंडमध्ये 6:51:36 वेळेत अंतर कापत तिसरे स्थान मिळवून सेमीफायनलमधील स्थान पक्के केले.

शूटींग – दिव्यांश आणि दीपकचे सुमार प्रदर्शन

सध्या भारत शूटींग स्पर्धेमध्ये खेळत असून दीपक आणि दिव्यांश हे भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळी दोघांनी सुमार प्रदर्शन दाखवले आहे. दोन सीरीजनंतर दीपक 34 आणि दिव्यांश 36 व्या क्रमांकावर आहे. दीपकची सरासरी 10.3 तर दिव्यांशची 10.2 आहे.

बॉक्सर विकास कृष्ण यादव बाहेर

भारताचा अनुभवी बॉक्सर विकास कृष्ण यादव ऑलिम्पिकमधून बाहेर पडला आहे. बॉक्सिंगमध्ये 69 किलोग्रॅमच्या राऊंडच्या 32मध्ये जपानच्या सेवोनरेट्स क्विंकी मेनसाह ओकाजावाने 5-0 ने पराभव केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com