साहेब, मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवा; आदित्य ठाकरेंना आर्त हाक...

साहेब, मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवा; आदित्य ठाकरेंना आर्त हाक...

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहरातील दोन उड्डाणपुलांच्या Proposed Flyover Construction नावाखाली 588 वृक्ष तोडण्याच्या Tree Cutting मनपाच्या प्रयत्नांना पर्यावरण प्रेमींनी विरोध केला आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. याच वेळी, आदित्य ठाकरेंनी दोनशे वर्षांपूर्वीचे जे झाड कत्तल होता होता वाचवले....

आज याच झाडाच्या परिसरात मंत्री आदित्य ठाकरे पाहणी करणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर झाडाच्या समोर 'साहेब, मला आणि माझ्या कुटुंबाला वाचवा' अशा आशयाचा संदेश या झाडाच्या खाली लिहिण्यात आला आहे.

कारण, प्रचंड मोठा व्यास असलेल्या या झाडावर असंख्य पक्ष्यांचे घरटी आहेत. हेच कुटुंब आज आदित्य यांना आर्त हाक देत आहेत.

आज या वृक्षाबाबतची महत्वाची सुनावणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. नाशिकमधील वृक्षप्रेमी ऋषिकेश नाझरे आणि मानव उत्थान मंचचे जसबीर सिंग यांच्यासह अन्य वृक्षप्रेमींनी ही याचिका दाखल केली आहे.

या याचिकेत राज्य शासन, वनविभागाचे वनसंरक्षक, नाशिक मनपा, आयुक्त कैलास जाधव, वृक्ष प्राधिकरण समिती आणि या समितीचे सर्व सदस्य शहर अभियंता यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.

नाशिकमधील वृक्षतोडीसंदर्भात यापूर्वी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्यात कोणते वृक्ष तोडावे आणि कोणते तोडू नयेत याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, आज आदित्य ठाकरे हे झाड वाचविण्यासाठी काय प्रयत्न करणार? नाशिककर पर्यावरणप्रेमींना काय गिफ्ट देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.