पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जिल्हा दौर्‍यावर

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जिल्हा दौर्‍यावर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुके (Drought affected talukas )म्हणून ओळख असलेल्या येवला, चांदवड, कळवण, सुरगाणा या तालुक्यांमधील काही गावांना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray ) हे भेट देणार आहे. दि. 12 व 13 मे 2022 रोजी नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर ते येत आहेत. खरडशेत (ता.त्र्यंबकेश्वर) येथील पाण्याची समस्या सोडवल्यानंतर नामदार ठाकरे हे जिल्हा दौर्‍यावर येत असल्याने त्यांच्या दौर्‍याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढत असून चाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान कमाल तापमानाची नोंद होत आहे. यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यासह सुरगाणा, दिंडोरी या आदिवासी बहुल लोकसंख्येच्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

या गावांना पाणी पुरवणार्या शासकीय योजनांची सद्यस्थिती काय आहे, याविषयी शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्यासह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.6) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची भेट घेतली.

यावेळी त्यांनी पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेतला. शासकीय योजनांची कामे वेळेत कशी पूर्ण होतील,यादृष्टीने शिवसेना पाठपुरावा करणार आहे. तसेच शिवसेना स्व:निधीतून काही कामे करणार आहेत. ज्या गावांमध्ये पाण्याचे स्त्रोत सद्यस्थितीला जीवंत नाहीत, अशा गावांमध्ये पाण्याच्या टाक्या पुरवल्या जातील. तसेच सार्वजनिक विहीरींमध्ये पाणी कसे पुरवले जाईल, याचेही नियोजन केले जाणार आहे.

त्र्यंबकराजाचेही दर्शन घेणार

त्र्यंबकेश्वरला पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे शुक्रवारी (दि.13) त्र्यंबकला त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. तसेच मुंबईला जाताना इगतपुरी तालुक्यातील काही गावांना भेट देणार आहेत.

Related Stories

No stories found.