सर्वोच्च आदेश : मुलींना NDA मध्ये मे पासून नाही तर नोव्हेंबरपासूनच प्रवेश

सर्वोच्च आदेश : मुलींना NDA मध्ये मे पासून नाही तर नोव्हेंबरपासूनच प्रवेश

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) द्वार मुलींसाठी खुले केलेले आहे. या संधीपासून मुलींना वंचित ठेवणाऱ्या मानसिकतेवर कठोर ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना ‘एनडीए’ची प्रवेश परीक्षा देण्यास परवानगी दिली. केंद्र सरकारची मे 2022 पासून मुलींना प्रवेश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) फेटाळली. यावर्षी नोव्हेंबरपासून मुलींसाठी NDA चे दार न्यायालयाने उघडले. या प्रकरणाची सुनावणी जानेवारी 2020 मध्ये ठेवली.

सर्वोच्च आदेश : मुलींना NDA मध्ये मे पासून नाही तर नोव्हेंबरपासूनच प्रवेश
धमाका होणार; तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरात, हे आहेत १५ जण

महिला व मुलींना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सहभागी करण्यात यावं, यासाठी दाखल केल्या गेलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त प्रतिज्ञापत्र दाखल केले. त्यात सरकारने मुलींच्या NDA प्रवेशासाठी मे 2022 पर्यंत वेळ मागितला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सरकारची ही मागणी फेटाळली. यावर्षी 14 नोव्हेंबरला घेण्यात येणार्या परीक्षेला मुलींना प्रवेश देण्याचे आदेश दिले.

Related Stories

No stories found.