जिल्ह्यातील 'या' दोन बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

जिल्ह्यातील 'या' दोन बड्या नेत्यांचा शिंदे गटात प्रवेश

घोटी | जाकीर शेख Ghoti

इगतपुरी तालुक्याचे ( Igatpuri Taluka ) शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग गांगड ( Pandurang Gangad ) व नुकतेच भाजप मधून काँग्रेसमध्ये आलेले माजी सभापती संपत काळे ( Sampat Kale )यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार काशीनाथ मेंगाळ व जयंत साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे प्रवेश केला आहे.

दरम्यान तालुक्यातील सरपंच परिषदेचे काही पदाधिकारी यांनी देखील यावेळी प्रवेश केला आहे त्यामुळे तालुक्यातील शिंदे गटाची ताकद वाढली आहे राज्यातील बदललेल्या राजकीय गणितामुळे हे चित्र बघायला मिळत आहे. दरम्यान शिंदे गटात माजी आमदार काशीनाथ मेंगाळ यांनी प्रवेश केल्यानंतर माजी आमदार पांडुरंगबाबा गांगड यांनी देखील प्रवेश केल्याचे तालुक्यात ठिकठिकाणी चर्चाना उधाण आले होते.

यावेळी इगतपुरी तालुक्यातून माजी सभापती रघुनाथ तोकडे, बाळा गव्हाणे, देविदास जाधव, दिलीप जाधव, जयराम गव्हाणे, संदीप शिरसाठ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com