२०० उद्योजक घडवणार ‘उद्यमिता’ प्रकल्प

२०० उद्योजक घडवणार ‘उद्यमिता’ प्रकल्प
USER

सातपूर | प्रतिनिधी Satpur-Nashik

कौशल्य विकास (Skill development), रोजगार आणि उद्योजकता आयुक्तालय (Commissionerate of Employment and Entrepreneurship) व लेट्स इंडोर्स (Let's endors) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात, उद्यमिता (Entrepreneurship) हा प्रकल्प सुरू करण्यात आला असून

त्यातून २०० उद्योजक (Entrepreneur) घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र (District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center) नाशिकच्या सहायक आयुक्त श्रीमती अनिसा तडवी (Mrs. Anisa Tadvi) यांनी सांगितले.

उद्यमिता हा प्रकल्प रायगड (Raigad), नाशिक(Nashik), पुणे (Pune), यवतमाळ (Yavatnal), नांदेड (Nanded) आणि चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याद्वारे, शेकडो अतिसूक्ष्म, सूक्ष्म, लघुउद्योजकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. उद्यमिता ही उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या उद्देशाने उभी केलेली यंत्रणा आहे.

या माध्यमातून शासनाच्या प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (Prime Employment Generation Program), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CM Employment Generation Program), पंतप्रधान मुद्रा योजना (Mudra Yojna), अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ अशा इतर सर्व आर्थिक मागास विकास महामंडळे यासारख्या राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे.त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येईल.

कोरोनानंतर रोजगार निर्मितीमध्ये तयार झालेली पोकळी आणि बेरोजगारी (Unemployment) या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) आणि लेट्स इंडोर्स यांचा ‘उद्यमिता’ प्रकल्प उद्योजकता संस्कृतीला प्रोत्साहन सह स्वयंरोजगाराद्वारे उपजीविका निर्मिती करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.

या प्रकल्पाचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, आयटीआय सातपूर (ITI Satpur) या कार्यालयावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नाशिकच्या सहायक आयुक्त श्रीमती अनिसा तडवी यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com