'शार्क टँक इंडिया'मध्ये पाऊल ठेवताच 'त्यांचं' नशिब पालटलं; वाचा नेमकं काय घडलं?

'शार्क टँक इंडिया'मध्ये पाऊल ठेवताच 'त्यांचं' नशिब पालटलं; वाचा नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

शार्क टँक इंडियाच्या पहिल्या सिझनच्या अफाट यशानंतर आता पुन्हा दुसरा सिझन प्रदर्शित होत आहे. या शोमध्ये आलेल्या उद्योजक गणेश बालकृष्णन यांची जोरदार चर्चा सुरु आहे....

गणेश यांनी शार्क टँक इंडिया या शोमध्ये पाऊल ठेवल्यानंतर त्यांचे नशिब रातोरात पालटले आहे. घडले असे की, गणेश बालकृष्णन यांना शार्क टँक इंडियामध्ये परीक्षकांकडून गुंतवणूक मिळाली नाही. पण, सोशल मीडियावरून गणेश यांना पाठिंबा मिळाल्याचे दिसून येते.

आयआयएम आणि आयआयटी विद्यार्थी असलेल्या गणेश यांनी शार्क टँक इंडियामध्ये आपल्या कहाणीने सर्वांनाच भावूक केले. त्यांचा व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यांनी 2019 मध्ये Flatheads Shoes या नावाच्या कंपनीची स्थापना केली. त्यांचा हा व्यवसाय चांगला सुरू होता. मात्र करोना व्हायरसने सर्वच उद्ध्वस्त केले. हा व्यवसाय बुडण्यापासून वाचवण्यासाठी त्यांनी दोन महिन्यांत 35 लाख रुपये खर्च केले होते.

'शार्क टँक इंडिया'मध्ये पाऊल ठेवताच 'त्यांचं' नशिब पालटलं; वाचा नेमकं काय घडलं?
सावधान! केळी खाताय? आधी 'हा' व्हिडीओ पाहा...

गणेश शार्क टँक इंडियामध्ये याच व्यवसायासाठी गुंतवणूक मिळवण्यासाठी आले. मात्र या शोमध्येही त्यांना परीक्षकांकडून मदत मिळाली नाही. मात्र बालकृष्णन यांना सोशल मीडियावरून भरपूर पाठिंबा मिळाला आहे.

'शार्क टँक इंडिया'मध्ये पाऊल ठेवताच 'त्यांचं' नशिब पालटलं; वाचा नेमकं काय घडलं?
ताशी १२० किमी वेग, एकाच उडीत 'त्याने' कापले तब्बल २२ फूट अंतर; पाहा Viral Video

फक्त 48 तासांच्या आता त्यांना इतके ऑर्डर्स मिळाले की, त्यांची संपूर्ण इन्वेंट्री रिकामी झाली आहे. बालकृष्णन यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com