ICC T20 World Cup : स्वप्न भंगले;भारतावर इंग्लंडचा १० गडी राखून विजय

ICC T20 World Cup : स्वप्न भंगले;भारतावर  इंग्लंडचा १० गडी राखून विजय

नवी दिल्ली | New Delhi

इंग्लंडने (England) १० विकेटने भारताचा (India) पराभव करत फायनलमध्ये (Finals) धडक मारली आहे. त्यामुळे भारताच्या पराभवासह कोट्यवधी भारतीयाचं स्वप्न भंगले आहे...

प्रथम फलंदाजी करतांना भारताने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेला इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर (Captain Jos Buttler) आणि अॅलेक्स हेल्ससने (Alex Hales) भारतीय गोलदाजांची धुलाई करत विजय खेचून आणला. बटलरने नाबाद ८० तर हेल्सने नाबाद ८६ धावांची खेळी करत इंग्लंडला १६ व्या षटकांत विजय मिळवून दिला.

दरम्यान, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्या, मोहम्मद शमीसह भारताच्या इतर गोलंदाजांना या सामन्यात जराही कमाल दाखवता आली नाही. तसेच सर्वाधिक विकेट घेणारा अर्शदीप महत्वाच्या सामन्यात फेल ठरला. तर भुवनेश्वर कुमार आणि शमीलाही हेल्स आणि बटलरला रोखता आले नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com