अभियांत्रिकीचे शिक्षण आता मराठीसह आठ भाषांमधून

अभियांत्रिकीचे शिक्षण आता मराठीसह आठ भाषांमधून
USER

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने आता महाविद्यालयांना आठ भाषांमध्ये इंजिनीयरिंगचे शिक्षण देण्याची परवानगी दिली आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षापासून मराठीसह हिंदी, बंगाली, तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नड आणि मल्याळम या आठ स्थानिक भाषांमध्ये अभियांत्रिकी शिक्षण घेता येणार आहे.

या निर्णयामुळे ग्रामीण तसेच आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आत्तापर्यंत इंग्रजीच्या भीतीने अनेक हुशार विद्यार्थी इंजिनीयरिंगपासून दूर राहिले आहे. जर्मनी, फ्रान्स, रशिया, जपान, चीन अशा देशांमध्ये त्यांच्या स्थानिक भाषांमधून शिक्षण दिले जाते.

परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे म्हणाले की विद्यार्थ्यांना जर त्यांच्या मातृभाषेमध्ये तांत्रिक शिक्षण घेता आले तर त्यांचा पाया मजबूत व्हायला मदत होईल. आम्हाला पूर्ण देशामधून एकूण 500 अर्ज आले आहेत.

भविष्यात आम्ही इंजिनीयरिंगचे पदव्युत्तर शिक्षण आणखी 11 भाषांमधून देण्यासंदर्भातले नियोजन करत आहोत. परिषद या सर्व कोर्सच्या अभ्यासासाठी लागणारी पुस्तके,नोट्स हे सर्व काही या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com