परिवहन मंत्री अनिल परब ED च्या रडारवर, ७ ठिकाणी छापेमारी; काय आहे आरोप?

परिवहन मंत्री अनिल परब ED च्या रडारवर, ७ ठिकाणी छापेमारी; काय आहे आरोप?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राचे परिवहनमंत्री आणि शिवसेना (Shivsena) नेते अनिल परब (Anil Parab) यांच्या विरोधात ईडीने (Enforcement Directorate ED) कारवाई सुरू केली आहे. अनिल परब यांच्याशी संबंधित ७ ठिकाणी ED ची धाड पडली आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ED ने ही धाड टाकली असून मुंबईसोबतच पुणे आणि रत्नागिरीमधील ठिकाणांचीही पाहणी केली जात आहे. ED चे अधिकारी सकाळी अनिल परब यांच्या वांद्रे येथील घरी आणि मरिन ड्राईव्हमधील सरकारी निवासस्थानी दाखल झाले आहेत. यासोबत पुणे आणि रत्नागिरीमधील अनिल परब यांच्या मालकीच्या जागांचीही पाहणी केली जात आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे माहिती मिळत आहे. त्याशिवाय, ईडीने अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान, याआधी अनिल परब यांच्या सीएच्या घरी आयकर विभागाने (Income tax) छापेमारी केली होती. अनेक ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. अनिल परब यांचे सीए आता आयकरच्या रडारवर होते. आता ईडीकडून झाडाझडती सुरु झाली आहे.

तसेच काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांच्यावरही ईडीने आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. तब्बल दोन महिन्यांपासून नवाब मलिक हे तुरुंगात आहेत. आता अनिल परब यांच्यावरही ईडीने थेट गुन्हाच दाखल केल्याने त्यांच्या अडचणी वाढल्याचे बोलले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com