Thursday, April 25, 2024
HomeUncategorized'एन्ड्युरन्स प्रीमियर लीग २०२२'ला प्रारंभ; पाहा फोटो

‘एन्ड्युरन्स प्रीमियर लीग २०२२’ला प्रारंभ; पाहा फोटो

नाशिक l प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद-नाशिक( Zilla Parishad Nashik ), काऊंटी रेंच-नाशिक(County Ranch-Nashik), हॉर्स रायडर्स नेट-लोणावळा व्हेन्यू पार्टनर ग्रेप काऊंटी रिसॉर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने एन्ड्युरन्स प्रीमियर लीग 2022 स्पर्धेला (Endurance Premier League 2022 competition) रविवारी (दि.26) रोप काऊंटी रिसॉर्ट, त्र्यंबकेश्वर रोड उत्साहात सुरुवात झाली….

- Advertisement -

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंगल, राज्याच्या कामगार कल्याण सचिव विनिता सिंगल, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, डॉ. साकिर खरपे, डॉ. भालेंद्र, जय भरत आदी उपस्थित आहेत.
आज(दि २६) सकाळी ६ वाजता एडयुरन्स प्रीमियर लीग स्पर्धेला सुरवात झाली.
यावेळी विनिता सिंघल, सचिव, कामगार विभाग यांनी फ्लॅग ऑफ / झेंडा दाखवुन स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी त्यांच्यासोबत ग्रेप काऊंटीचे तेजस चव्हाण व काऊंटी रँच स्टड फार्म चे समीर खान हे देखील उपस्थित होते.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, हॉर्स नेट लोणावळ्याचे खुशरू पटेल हे या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत.

असे आहे स्पर्धेचे स्वरूप

एन्ड्युरन्स प्रीमियर लीगचा मार्ग 24 किलोमीटर इतका असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरील द तेवीस कप या स्पर्धेच्या धर्तीवर याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येकी 40 ते 50 स्पर्धकांचा समावेश असणारे एकूण सात संघ या स्पर्धेसाठी सहभागी होत आहेत. आयोजकांनी एन्ड्युरन्स प्रीमियर लीगचे सूक्ष्म नियोजन करतांना नियमांच्या माध्यमातून स्पर्धकांबरोबरच सहभागी होणार्‍या अश्वांच्या सुदृढतेची व आरोग्याची विशेष काळजी घेतली जाणार आहे.

यामुळे या क्रीडाप्रकाराचा जास्तीत जास्त आनंद सर्वांना मिळेलच पण त्याचबरोबर भूतदयेचे देखील अनोखे उदाहरण सर्वांसमोर प्रकट होईल. अश्वाचा आणि त्यावर स्वार असणार्‍या अश्वरोहकाचा आपसांतील कौतुकास्पद समन्वय यानिमिताने बघायला मिळणार आहे. दरवेळी अनोख्या उपक्रमांनी आपले वेगळेपण सिद्ध करणारे नाशिक शहर, या एन्ड्युरन्स प्रीमियर लीगच्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण देशभरात चर्चेत आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या