Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्या'या'कारणाने थांबली अतिक्रमण मोहिम

‘या’कारणाने थांबली अतिक्रमण मोहिम

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवर (Aurangabad Road) झालेल्या अपघातानंतर (accident) नाशिक महापालिकेने (Nashik Municipality) अतिक्रमण मोहिम (Encroachment campaign) राबविण्यास सुरुवात केली आहे. शहरातील विविध भागात अतिक्रमण मोहिम सुरु करण्यात आली आहे.

- Advertisement -

अतिक्रमण विभागाच्या (Encroachment Department) एका चुकीमुळे बुधवारी आयोजित केलेली अतिक्रमण मोहिम स्थगित करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. ही मोहिम आता दिवाळीनंतर (diwali) राबविण्यात येणार आहे. नाशिक शहरात (nashik city) औरंगाबाद रोडवर भीषण अपघात झाला होता. त्यानंतर याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी (Chief Minister) पाहणी केल्यानंतर शहरातील अतिक्रमण (Encroachment) हटविण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकूंडवार (Municipal Commissioner Dr. Chandrakant Pulkundwar) यांनीं सुद्धा नाशिक शहरातील अतिक्रमणाबाबत नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता अतिक्रमण विभागाने शहरात अतिक्रमण मोहिम (Encroachment campaign) राबविण्यास सुरुवात केली आहे.

औरंगाबाद रोडवरील मिर्ची हॉटेलच्या चौकात अतिक्रमणासाठी मार्किंक करण्यात आले असून अनेकांनी याठिकाणी अतिक्रमण स्वयंपूर्तीने काढण्यास सुरुवात केलीं आहे. त्याचबरोबर मंगळवारी शहरातील सिडको भागात अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली होती.

बुधवारी सकाळी गोल्फक्लब मैदानापरिसरातील व मैदानातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण विभागाने तयारी केली होती. यासाठीचे सगळी तयारी झाली असतांना पोलीस बंदोबस्तच नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलीस बंदोबस्तासाठी मुख्यालयातून देण्यात येणारे पत्रच पोलीस आयुक्तांना दिले नसल्याने ही मोहिम स्थगित करण्याची वेळ अतिक्रमण विभागावर आली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या